Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याआगामी काळात आम्हाला...; मुख्यमंत्री शिंदेंनी केली पंतप्रधान मोदींना विनंती

आगामी काळात आम्हाला…; मुख्यमंत्री शिंदेंनी केली पंतप्रधान मोदींना विनंती

नागपूर | Nagpur

आज नागपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते समृद्धी महामार्गच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा पार झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली आहे….

- Advertisement -

मुख्यमंत्री म्हणाले की, तुम्ही भारतीय अर्थव्यवस्था उंचावर नेली आहे. पंतप्रधान मोदींनी जगभरात भारताचे नाव मोठे केले आहे. महाराष्ट्रावर तुमचा आशिर्वाद कायम असू द्या, महाराष्ट्रात सगळ्या लोकांना मदत करायची आहे.

माझ्यासाठी हा क्षण स्वप्नपूर्ती, अभिमान आणि गर्वाचा आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी हजर आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी विश्वास दाखवला आणि आज महामार्ग उभारला आहे. या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले त्याबद्दल समाधानी आहे.

शिंदे-फडणवीस तुम्ही लोकांची काम करा, केंद्र सरकार तुमच्यासोबत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले होते, येणाऱ्या काळातही तुमच्याचे सहकार्य असेच असावे, असे ते म्हणाले.

तुम्ही रेल्वे, रस्त्यांसाठी लाखो, कोट्यवधी रुपये देण्याची तरतूद केली आहे. आगामी काळात आम्हाला मदत हवी आहे. आमच्या महाराष्ट्रात उद्योग यावे, मोठ-मोठे प्रकल्प यावे, लोकांना रोजगार मिळावे, अशी आमची अपेक्षा आहे. तुम्ही आम्हाला सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी मोदींना केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या