Friday, July 5, 2024
Homeनाशिकमुख्यमंत्री शिंदेंनी घेतले संतश्रेष्ठ निवृतिनाथ महाराजांच्या पालखीचे दर्शन

मुख्यमंत्री शिंदेंनी घेतले संतश्रेष्ठ निवृतिनाथ महाराजांच्या पालखीचे दर्शन

नाशिक | Nashik

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shine) हे आज शिक्षक मतदारसंघातील महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराच्या प्रचारार्थ आढावा बैठक घेण्यासाठी नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शहरातील हॉटेल एक्स्प्रेसइनमध्ये बैठक घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी नुकतेच त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे (Trimbakeshwar to Pandharpur) प्रस्थान ठेवलेल्या संतश्रेष्ठ निवृतिनाथ महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले.

हे देखील वाचा : Nashik News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नाशकात आगमन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षक संघटनांशी संवाद साधून गणेशवाडी (Ganeshwadi) येथे मुक्कामी असलेल्या संतश्रेष्ठ निवृतिनाथ महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी पालखीचे पूजन करून आरती देखील केली. त्यानंतर संतश्रेष्ठ निवृतिनाथ महाराज विश्वस्त ट्रस्टकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आ.देवयानी परांदे, आ.सिमा हिरे, आ. सुहास कांदे, संपर्क नेते भाऊलाल चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, भाजपा प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी, रिपाई नेते प्रकाश लोंढे, गणेश गिते यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा : Eknath Shinde : “मी त्यांना…”; लक्ष्मण हाकेंनी उपोषण स्थगित केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे यांनी स्थगित केलेल्या आमरण उपोषणावरही भाष्य केले. ते म्हणाले की, “काल शुक्रवारी यासंदर्भात बैठक झाली होती. या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्रीही उपस्थित होते. त्यावेळी विविध मुद्द्यावर बोलणे झाले.आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याबाबत चर्चा झाली. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात यासंदर्भातील काही विषयांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचेही ठरले आहे. आज सरकारचे एक शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले होते.त्यामुळे हाके यांनी शिष्टमंडळाचा मान ठेवत उपोषण मागे घेतले आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो”, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या