Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्र्यांची विधानसभेत पूरग्रस्तांसाठी मोठी घोषणा; उद्धव ठाकरेंना टोला लगावत म्हणाले...

मुख्यमंत्र्यांची विधानसभेत पूरग्रस्तांसाठी मोठी घोषणा; उद्धव ठाकरेंना टोला लगावत म्हणाले…

मुंबई | Mumbai

सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीची मोठी घोषणा केली आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोलाही लगावला आहे…

- Advertisement -

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांना मदत वाढवली आहेत. आतापर्यंत १० कोटी रुपये वाटले आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. शेतकऱ्यांना आता केंद्राचे मिळून वर्षाला १२ हजार रुपये मिळणार आहे. पुरात ज्यांचे नुकसान झाले त्यांना १० हजार रुपये मदत आपण देणार आहोत.

Udyog Rattan Award : राज्याचा पहिला ‘उद्योग रत्न’ पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर!

टपरीवाल्यांनाही ५० हजारांची मदत करण्यात येणार आहे. नुकसान जास्त असेल तर ७५ टक्के नुकसान देण्यात येईल. तसेच छोटी टपरी असेल तर १० हजार रुपये मदत देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.

शिंदे गटाच्या आमदाराची तब्बल साडेसात कोटींची फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल… काय आहे प्रकरण?

ते पुढे म्हणाले की, इर्शाळवाडी येथील दरडग्रस्तांची कंटेनरमध्ये व्यवस्था केली आहे. भूखंड बघितला आहे. त्यांची कायम सोय करण्यात येणार आहे. सिडको त्यांना घरे बांधून देणार आहे. आम्ही रस्त्यावर उतरुन काम करणारे लोक आहोत, आमचे वर्क फ्रॉम होम करत नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

NCP Crisis : ‘घड्याळा’बाबत रोहित पवार यांचं सूचक विधान; म्हणाले, “चिन्ह राहिलं नाही तरी…”

- Advertisment -

ताज्या बातम्या