नागपूर । प्रतिनिधी Nagpur
महाविकास आघाडी गेली अडीच वर्षे रडत बसली होती. केवळ आम्हाला शिव्याशाप देण्यातच त्यांनी अडीच वर्षे वाया घालवली. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसली तरी आम्ही रडत न बसता विकासकामे करत होतो आणि यापुढेही करत राहणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपले रडगाणे थांबवून राज्याच्या विकासाचे गाणे गा, राज्याच्या विकासात सहभागी व्हा, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधान परिषदेत जोरदार फटकेबाजी केली. अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या कायापालटाला सुरुवात झाली असून आता आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी सभागृहात दिली.
सारडा परिवाराचे शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना एकनाथ शिंदे विरोधकांवर अक्षरशः तुटून पडले. विशेषत: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी टोलेबाजी केली. गेल्या अडीच वर्षांत महायुतीने विकास आणि कल्याणकारी योजनांची ऐतिहासिक कामे केली आहेत. एक क्षणही न थांबता, एकही सुटी न घेता आम्ही टीमवर्क म्हणून केलेल्या कामामुळे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राने इतिहास घडवला. विकासकामांमुळे आम्ही जनतेचे लाडके सरकार ठरलो आणि त्यांनी आम्हाला ऐतिहासिक विजय मिळवून देत पुन्हा निवडून दिले, असे शिंदे म्हणाले.
नाशिक महानगरपालिकेला मिळणार लवकरच नवे आयुक्त?
आमच्यावर झालेल्या टीकेला आम्ही विकासकामांनी उत्तर दिले आहे. आम्ही केलेल्या कामांमुळेच महायुतीच्या सरकारने अडीच वर्षांत विकासात महाराष्ट्र मॉडेल तयार केला आणि विकासकामांचा स्ट्राईक रेट देशात सर्वाधिक होता. अडीच वर्षांपूर्वी राज्यात खर्या अर्थाने सत्तापालट झाला आणि आम्ही जनतेच्या मनातले सरकार आणले. खरेतर 2019 मध्येच जनतेच्या मनातले सरकार यायला हवे होते. पण जनतेला हवे असलेले सरकार 2022 मध्ये आणले. त्यावेळी घटनाबाह्य सरकार आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून आमच्यावर टीका झाली. पण घटनाबाह्य मुख्यमंत्र्याने जनतेच्या न्यायालयात प्रचंड विजय मिळवला. किती आरोप आणि टीका झाली तरी आम्ही थांबलो नाही, असे सांगतानाच नवाबी सरकारपेक्षा आमचे गुलाबी सरकार केव्हाही चांगले आहे, असा चिमटा शिंदे यांनी काढला.
Nashik News : बेशिस्त वाहनचालकांना दणका; ४६० जणांवर कारवाई
आम्ही अडीच वर्षांत अनेक योजना राबवल्या, अनेक विकासकामे केली. त्यामुळे हे गुलाबी वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. मी आणि आमचे सर्व सहकारी रडणारे नव्हे तर लढणारे आहेत, असे विरोधकांना ठणकावतानाच निवडणुकीदरम्यान टोकाची टीका करताना, एकतर तू राहशील किंवा मी राहीन…असे म्हणणारे मुख्यमंत्र्यांना येऊन पुष्पगुच्छ भेट देतात, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : एकाही पात्र बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत 2 कोटी 34 लाख लाडक्या बहिणींना पाच हप्ते दिले असून यापुढेही ते मिळत राहणार आहेत. यंदाच्या पुरवणी मागणीमध्ये 1400 कोटींची तरतूदही केली असून एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही सुरू केली असून 89 लाख कुटुंबांना वर्षातून तीन सिलिंडर मोफत दिले जात आहेत. ‘मुख्यमंत्री लेक लाडकी’ योजनेत 34 हजार जणांना लाभ दिला असून साडेतीन लाखांपेक्षा जास्त मुलींनी मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.