मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar )यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी बिघडली होती. मागील तीन दिवसांपासून शरद पवार हे ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचार घेत आहे.
- Advertisement -
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde )आज पवारांच्या यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात पोहचले. रुग्णालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्यानंतर शरद पवार आणि शिंदे यांच्यामध्ये जवळपास दहा मिनिटे चर्चा झाल्याचे समजते. उद्या शरद पवार शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला संबोधन करण्यासाठी हेलिकॉप्टरने जाणार आहे. पक्षाचं शिबिर संपल्यानंतर पुन्हा हॉस्पिटल मध्ये भरती होणार आहे.असे शरद पवार यांनी सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले