Tuesday, April 23, 2024
Homeधुळेविजेच्या खांबाचा शॉक लागल्याने बालकाचा मृत्यू

विजेच्या खांबाचा शॉक लागल्याने बालकाचा मृत्यू

धुळे । dhule। प्रतिनिधी

शहरातील वडजाई रोडवरील गफ्फुर नगरात घराजवळ खेळणार्‍या दहा वर्षाच्या बालकाला (child) विजेच्या खांबाचा (Electric pole) शॉक (Shock) लागल्याने त्याचा जागीच मृत्यू (death) झाला. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अरशद अश्पाक अहमद मोमीन (वय 10) असे मयत बालकाचे नाव आहे.

- Advertisement -

वडजाईरोड गफुनगर परिसरात अरशद हा त्याच्या घराजवळ इतर मुलांबरोबर खेळत होता. अरशदचा विजेच्या खांबाला हात लागला. त्यावेळी त्याला विजेचा शॉक लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला. वीज वितरण विभागाच्या गलथान कारभारामुळेच या बालकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करून स्थानिकांनी व नातेवाईकांनी संबंधित वीज वितरण अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करा व संबंधित अधिकार्‍यास तात्काळ निलंबित करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तत्काळ दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्याच्या इशारा यावेळी देण्यात आला.

या प्रकरणात महावितरणाचा हलगर्जीपणा असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांनी केली आहे. वीज कंपनीचे प्रभारी कार्यकारी अभियंता राजेश पाटील यांनी चौकशी करुन अहवाल सादर झाल्यानंतर कारवाई केली जाईल. तसेच भरपाई देखील दिली जाईल असे सांगितले.

यावेळी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री.पाटील, वडजाई रोड येथील उपअभियंता श्री. चव्हाण, श्री. साळुंके, महापालिकेचे कनिष्ठ अभियंता श्री.बागुल, नगरसेवक मुख्तार बिल्डर, डॉ.सरफराज अन्सारी उपस्थित होते.

दुर्घटनेची चौकशी करा- महावितरणाच्या बेजबाबदारपणामुळे शहरातील गफ्फुरनगर येथे बालकाचा बळी गेला आहे. या दुर्घटनेची चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी व बालकाच्या परिवाराला शासनाकडून तत्काळ मदत मिळावी अशी मागणी आ.फारुख शाह यांनी अधिक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे. या दुर्घटनेच्या ठिकाणी महावितरण व महापालिकेच्या अधिकार्‍यांसोबत जावून आ. शाह यांनी पीडित परिवाराचे सांत्वन केले व आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

आ.फारुख शाह

- Advertisment -

ताज्या बातम्या