Friday, September 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुर्दैवी : पाण्याच्या बादलीत बुडून बालकाचा मृत्यू

दुर्दैवी : पाण्याच्या बादलीत बुडून बालकाचा मृत्यू

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

देवळालीगावमधील रोकडोबावाडी भागात एका दहा महिन्याच्या चिमुकल्याचा पाण्याच्या बादलीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रोकडोबावाडी देवळालीगाव येथे राहणारे अजय तायडे यांचा मुलगा रोशन हा रात्री साडेआठच्या सुमारास घरात खेळत असताना पाण्याने भरलेल्या बादलीत पडला. त्यावेळी त्याची घरात आई स्वयंपाक करत होती. रोशन घरातच असल्याचे गृहीत धरून कुणालाही काही शंका आली नाही. मात्र काही वेळाने रोशन कुठे दिसत नाही, हे लक्षात येताच घरात आणि आजूबाजूला शोध घेण्यात आला.

शोध घेत असताना तो घरातच ठेवलेल्या पाण्याच्या बादलीत बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याला तातडीने आजोबांनी बिटको रुग्णालयात नेले. परंतु वैद्यकीय अधिकारी डॉ. उगले यांनी त्याला मृत घोषित केले. ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

BRICS

BRICKS Summit 2026: BRICSचा महासंगम! मोदी, पुतीन, शी जिनपिंग एकाच मंचावर...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiभारताच्या अध्यक्षतेखाली १८वी BRICS शिखर परिषद (18th BRICKS Summit 2026) १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील भारत...