Friday, February 6, 2026
Homeक्राईमलहान मुलांच्या वादातून दोन गटांत हाणामारी

लहान मुलांच्या वादातून दोन गटांत हाणामारी

परस्पर विरोधी फिर्यादीवरून गुन्हे दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर तालुक्यातील खंडाळा गावच्या शिवारात लहान मुलांच्या वादातून दोन गटांत लाकडी दांडके, कुर्‍हाडीने हाणामारी झाल्याची घटना रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुवर्णा बाबासाहेब गव्हाणे (वय 38 रा. खंडाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोपट चंद्रभान गव्हाणे, कोमल पोपट गव्हाणे, आकाश सुरेश गिर्‍हे, कुसूम सुरेश गिर्‍हे, विकास सुरेश गिर्‍हे, सुरेश सुदाम गिर्‍हे (सर्व रा. खंडाळा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सुवर्णा या कुटुंबासह रविवारी रात्री घरी असताना साडेनऊच्या सुमारास पोपट गव्हाणे व इतर तेथे आले. तु माझ्या मुलाला का मारहाण केली म्हणून त्यांनी सुवर्णाला शिवीगाळ करून मारहाण केली. घरावर दगडफेक केली. फिर्यादी, त्यांचे पती व मुले तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याकडे जात असताना त्यांना रस्त्यात अडवून लाकडी दांडके, कुर्‍हाडीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

YouTube video player

दुसर्‍या गटाचे पोपट चंद्रभान गव्हाणे (वय 44 रा. खंडाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक मोहन गव्हाणे व सुवर्णा दीपक गव्हाणे (दोघे रा. खंडाळा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहान मुलांच्या झालेल्या वादाबाबत पोपट यांनी विचारणा केली असता दीपक व त्यांची पत्नी सुवर्णा यांनी पोपटला शिवीगाळ केली. दरम्यान, पोपट हे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याकडे जात असताना त्यांना रस्त्यात अडवून काठी व कुर्‍हाडीच्या तुंब्याने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...