नाशिक। प्रतिनिधी Nashik
निर्माणाधीन इमारतीच्या पाण्याच्या टाकीत बुडून अठरा महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. राैनक सुनील कनाेजे(रा. लालचंद साेसायटी, एमएसईबी काॅलनीजवळ, जेलराेड) असे मृत बालकाचे नाव आहे. याबाबत उपनगर पाेलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.
राैनक हा शनिवारी(दि. ५) दुपारी अडीच वाजता लालचंद साेयायटीच्या निर्माणाधीन इमारतीत खेळत हाेता. तर त्याचे आई वडील मजुरीचे काम करत हाेते. खेळता खेळता ताे या साेसायटीच्या नव्या पाण्याच्या टाकीजवळ गेला. तेव्हा अचानक काेसळून टाकीत बुडाला.
टाकी पाण्याने बरीच भरलेली असल्याने ताे गटांगळ्या खाऊन बुडू लागला. नाकाताेंडात पाणी गेल्याने ताे बेशुद्ध हाेऊन काही क्षणांत टाकीच्या तळाशी गेला. काही वेळाने कुटुंबाने शाेधाशाेध केली करताना पाण्याच्या टाकीचा त्यांना संशय आल्याने लहान बालक पाण्याच्या टाकीत आढळून आला.टाकीतून त्याला बाहेर काढून बिटकाे रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी बालकास तपासून मृत घाेषित केले. पुढील तपास उपनगर पाेलीस करत आहेत.