Wednesday, April 2, 2025
Homeधुळेआयशरच्या धडकेत बालक ठार ; तिघे गंभीर जखमी

आयशरच्या धडकेत बालक ठार ; तिघे गंभीर जखमी

धुळे । प्रतिनिधी dhule

मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग गाव शिवारात बीएसएनएल टॉवरसमोरील गतीरोधकाजवळ भरधाव आयशरने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात बालक ठार झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत.

- Advertisement -

हा अपघात गुरूवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास झाला. येशीनाथ बुधा पाटील (वय 50) व दिलीप पंडीत खैरनार (वय 5 रा.मोघण ता.धुळे) हे दुचाकीने (क्र.एमएच 18/बीपी-1742) जात होते. यावेळी दुसर्‍या दुचाकीवर योगेश सुकदेव नेरकर (वय 41), दिपाली योगेश नेरकर (वय 35 रा.झोडगे ता.मालेगाव) हे दोघे जात असतांना भरधाव आयशर ट्रकने (क्र.एमएच 18/बीजी- 7313) दोघा दुचाकींना मागावून जोरदार धडक दिली. त्यात दिलीप खैरनार हा बालक गंभीर जखमी होवून जागीच ठार झाला. तर येशीनाथ पाटील, योगेश नेरकर व दिपाली नेरकर हे तिघे जखमी झाले. अपघातानंतर आयशर चालक पसार झाला. याप्रकरणी ज्ञानेश्वर पंडीत खैरनार यांनी मोहाडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन आयशरवरील अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : आदिमायेच्या चैत्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज; गडावर प्लास्टिक बंदी

0
सप्तशृंगगड | नांदुरी | वार्ताहर | Nanduri आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर (Saptashrungi Gad) त्रिगुणात्मक स्वरूपी सप्तशृंगीमातेच्या चैत्रोत्सवास ५ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने...