Tuesday, May 6, 2025
Homeधुळेबालविवाह: 13 वर्षाची मुलगी झाली आई, चौघांवर गुन्हा

बालविवाह: 13 वर्षाची मुलगी झाली आई, चौघांवर गुन्हा

धुळे ।dhule । प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीचा (minor girl) विवाह (Marriage) लावून देण्यात आला. या पीडित मुलीने एका बाळाला जन्म दिल्याने बालविवाहाचा भांडाफोड झाला. याप्रकरणी पीडितेच्या पतीसह चौघांवर बलात्काराचा गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पाटण ता. शिंदखेडा येथे राहणार्‍या पीडित मुलीचा विवाह प्रभू राजू ठाकरे याच्याशी झाला होता. लग्नानंतर ती गरोदर राहिल्याने प्रसूतीसाठी तिला कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे तिने एका मुलीस जन्म दिला.

पीडिता ही 13 वर्षे 3 महिने वयाची असल्याने ही माहिती शिंदखेडा पोलिसांना देण्यात आली. त्यावरुन पीडितेची फिर्याद नोंदवून घेत तिचा पती प्रभू ठाकरे याच्यासह सासरे राजू दंगल ठाकरे, सासू रेखाबाई राजू ठाकरे, मंगला बुरु ठाकरे सर्व (रा. इंदिरा नगर, पाटण) यांच्याविरुद्ध शिंदखेडा पोलिसांत बालविवाह प्रतिबंध अधि. 2006 चे कलम 9, 10, 11 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधि. 2012 चे कलम 4 , 6, 8 सह भादंवि कलम 376/2/जे, के, आय,एन प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मिलिंद पवार हे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ind Vs Pak War Mock Drill : नाशिकमध्ये मॉक ड्रिलसाठी हायअलर्ट

0
  नाशिक | प्रतिनिधी Nashik केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशभरातील २४४ सिव्हिल डिफेन्स जिल्ह्यांमध्ये (नागरिक सुरक्षा जिल्हे) मॉक ड्रिल होणार असून, महाराष्ट्रातील नाशिकसह ठाणे, पुणे, तारापूर (पालघर),...