नंदुरबार । nandurbar प्रतिनिधी
डोडवा ता.अक्कलकुवा येथे होणारा बालविवाह (Child marriage) पोलीसांनी (police) रोखला (stopped ) आहे.
VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरण
डोडवा येथील एका अल्पवयीन मुलीचा गुजरात राज्यातील सेलंबा तालुक्याच्या गोटपाडा येथील एका तरुणासोबत दि.12मे रोजी होणार होता. ही माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. राजेश गावीत यांना कळवून अक्षता समितीमार्फत सदरचा बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करुन कायदेशीर तरतुंदींबाबत मार्गदर्शन करण्याचे आदेश दिले.
जळगावच्या म्हाळसेची ही आहे VISUAL STORY, स्टोरीत नथीचा नखरा करतोय सर्वाना घायाळVISUAL STORY # मानसी नाईक पुन्हा नववधू ?
मुलीचे वय 15 वर्षे 02 महिने होते. अक्षता समितीने अल्पवयीन मुलीच्या पालकांसोबत चर्चा केली. तसेच बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम यांची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई याबाबत माहिती देवून त्यांचे समुपदेशन करुन त्यांचे मनपरिवर्तन केले.
विद्यार्थिनीचा फोटो इंस्टाग्रामवर टाकून विनयभंगचोरून काढलेल्या फोटोंचा गैरफायदा : अत्याचार करीत विवाहितेला केले गरोदरलग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत फसवणूक
त्यामुळे हा बालविवाह रोखण्यात आला. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजेश गावीत, पोलीस उप निरीक्षक जितेंद्र महाजन, पोलीस हवालदार उल्हास ठिंगळे, महिला पोलीस नाईक कल्पना वसावे, पोलीस शिपाईक सतीश वळवी, दीपक पाटील यांच्या पथकाने केली.
कुटुंबिय झोपेत असतांना तरुणाची आत्महत्या