Wednesday, July 29, 2026
Homeक्राईम‘चाईल्ड पोर्नोग्राफी’चे व्हिडीओ सोशल मीडियावर केले व्हायरल

‘चाईल्ड पोर्नोग्राफी’चे व्हिडीओ सोशल मीडियावर केले व्हायरल

चौघांविरूध्द सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे (चाईल्ड पोर्नोग्राफी) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी चौघा इंस्टाग्रामधारक व्यक्तींविरोधात येथील सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 67 (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार निळकंठ रंगनाथ कारखेले (वय 36) यांनी फिर्याद दिली आहे.
आफझान शेख, वैभव कसबे, हर्ष भोगावत व जॅक जॉन अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघा इंस्टाग्रामधारकांची नावे आहेत. सदरचा प्रकार हा 25 ऑगस्ट 2021 ते 3 जुलै 2023 दरम्यान घडला आहे.

- Advertisement -

मात्र, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) यांनी दिलेल्या अहवालानंतर 1 जानेवारी 2025 रोजी येथील सायबर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. वरील चार इंस्टाग्राम धारक व्यक्तींनी लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रेकॉर्डिंग केलेले व्हिडीओ तसेच फोटो हे इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिध्द केले. सदरचे व्हिडीओ व फोटो इंस्टाग्राम कंपनीने हटवून तसा अहवाल नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) यांना सादर केला. त्यांनी संबंधित व्यक्तीचे तांत्रिक विलेश्षण करून राज्य सायबर पोलिसांना याची माहिती दिली.

संबंधीत व्यक्ती अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवाशी असल्याने सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी तसा अहवाल अहिल्यानगर जिल्हा पोलिसांकडे पाठविला. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम करत आहेत.

सोशल मीडियावर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे व्हिडीओ व फोटो व्हायरल करणे गुन्हा आहे. सोशल मीडिया कंपनीचे अशा प्रकारावर नियंत्रण असते. असा प्रकार त्यांच्या लक्ष्यात आल्यानंतर ते याबाबतची माहिती सायबर पोलिसांना कळवितात व सायबर पोलिसांकडून संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला जातो. तरी नागरिकांनी लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर प्रसिध्द करू नये, असे आवाहन येथील सायबर पोलिसांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Rahata : नगर-नाशिकवरील समन्यायीचे संकट टळले

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata यावर्षी विक्रमी वेळेत म्हणजे 28 जुलै 2026 रोजी रात्री उशिरा जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 65 टक्के म्हणजे 50 टीएमसी झाला आहे.काल...