Tuesday, December 3, 2024
Homeनगरबालदिन ठरणार वचन दिन; लाखो विद्यार्थी आई-वडिलांकडून घेणार मतदानाचे वचन

बालदिन ठरणार वचन दिन; लाखो विद्यार्थी आई-वडिलांकडून घेणार मतदानाचे वचन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत मतदारांनी 100 टक्के मतदानाची भूमिका बजवावी त्याचबरोबर मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी व मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी जिल्हा भरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये 14 नोव्हेंबर बालदिनी वचन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. बालदिनाच्या दिवशी वचनदिन राबवण्यात येणार असून यावेळी विद्यार्थी आई-वडिलांकडून वचन घेणार आहेत. यात प्रिय आई बाबा, मला माहित आहे की आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीचा व माझ्या भविष्याचा महत्त्वाचा संबंध आहे.

- Advertisement -

तुम्ही दोघांनी कुणाकडून काहीही न घेता निर्भयपणे मतदान केल्याने माझे भविष्य देखील निर्भय होणार आहे. त्यामुळे तुम्ही मला वचन द्या की तुम्ही जगातील सर्वात चांगले आई-बाबा म्हणून मला जे प्रेम दिले तेच प्रेम निरपेक्ष मतदानातून तुम्हीआपल्या महाराष्ट्राला देणार. तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून मी देखील लोकशाहीचा पाईक होणार आहे.
हे वचन शाळा /महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांकडून शिक्षकांमार्फत लाऊड स्पीकरवर प्रतिज्ञेसारखे म्हणून व लिहून घेतले जाणार आहे.घरी गेल्यावर हे वचनपत्र विद्यार्थी आई-वडिलांना देणार आहेत.

उपक्रमासाठी अशोक कडूस (स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकार) व भास्कर पाटील (अध्यक्ष मतदार जागृती मंच- मतदारनगरी तथा शिक्षणाधिकार) यांच्या मार्गदर्शन लाभले आहे. उपक्रमाचे फोटो/ व्हिडिओ /वृत्तांत करून सोशल मीडियावर शेअर करायचा आहे. उपक्रमासाठी राहुल पाटील (उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी), बाळासाहेब बुगे (शिक्षणाधिकारी-योजना), आकाश दरेकर (उपशिक्षणाधिकारी), मीना शिवगुंडे (उपशिक्षणाधिकारी), जयश्री कार्ले (विस्तार अधिकारी) डॉ. अमोल बागुल, (जिल्हा मतदारदूत) व सर्व स्वीप समिती सदस्य आदींनी सहकार्य केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या