Thursday, May 22, 2025
Homeनाशिक'या' विद्यालयात भरला बाल कुंभमेळा; मुकेश खन्ना यांची उपस्थिती

‘या’ विद्यालयात भरला बाल कुंभमेळा; मुकेश खन्ना यांची उपस्थिती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

विद्या सेवा संस्था नाशिक, संचलित प्रणित विद्यालयाने नुकताच बाल कुंभमेळा आयोजित केला. यावेळी विविध गुणदर्शन स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच विद्यार्थ्यांनी नाशिक शहराचे नाव जगभर पोहोचवावे या विचारातून या शाळेत विद्यार्थी तयार केले जातात.

विविध स्पर्धेत विद्यार्थी सहभागी होतात. प्रत्येक नाशिककरांना अभिमान वाटावा असे यश मिळवून, जीनियस वर्ल्ड रेकॉर्ड व इंडिया स्टार रेकॉर्ड मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी नाव कोरले आहे. त्यात आराध्या अनिल कापसे, धनश्री प्रवीण जोशी, निर्भय ईश्वर निकम, शिवन्या राजू कदम, यज्ञेश प्रवीण जोशी, हिरण्य देशमुख, वेदांत राठोड या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सुप्रसिद्ध हिंदी सिने कलावंत मुकेश खन्ना यांच्या हस्ते वर्ल्ड रेकॉर्ड केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देण्यात आले.

याप्रसंगी बोलताना मुकेश खन्ना असे म्हणाले, नाशिक हे पवित्र धार्मिक असे शहर असून शहराने सर्वच क्षेत्रात मोठी कर्तृत्ववान माणसं घडवलेली आहेत. प्रणित विद्यालयाचे नाव मी ऐकून होतो, या शाळेतील सात लहान विद्यार्थ्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला. याचा मला खूप आनंद वाटला या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी आणि नाशिककरांना भेटण्यासाठी मी येथे आलेलो आहे.

डॉ.पीसी शर्मा यांनी अतिशय मेहनत करून या विद्यार्थ्यांना न्यूरोसायन्स आणि गणित या विषयाचे उत्तम योग्य शिक्षण दिले. सराव करून घेतला म्हणून ही मुले वर्ल्ड रेकॉर्ड करू शकली.

बाल कुंभमेळ्यात उद्योजक मोतीलाल सांकला, बा.बा. वाघमारे, माजी महापौर रंजनाताई भानसी, आमदार ॲड. राहुल ढिकले, डॉ.राजेंद्र साबद्रा, मा. स्थायी समिती सभापती गणेश गिते, देविदास लाड, नगरसेवक अरुण पवार, चेतन गांधी, कमलेश गुंदेचा, संतोष साखला, राहुल चौधरी, मंजू राठी, नंदकिशोर साखला (संचालक साखला मॉल) व अनेक मान्यवर उपस्थित होते.

संस्थेचे सचिव गणेश पिंगळे यांनी प्रास्ताविक केले. बालकुंभमेळाचे संकल्पक व निर्मितीकार प्रणित पिंगळे व संस्थेचे अध्यक्ष सुरेखा पिंगळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सुप्रसिद्ध साहित्यिक महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचे कार्यवाह वि.दा.पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. या समारंभास पालक, विद्यार्थी व नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : ‘एफडीए’तील दोघांची चौकशी; सुपारीकांडाचा सखोल तपास, साखळी उघड...

0
नाशिक |प्रतिनिधी | Nashik अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे अधिकारी असल्याचे भासवत तिघांनी दोन ट्रकचालकांकडील रोकड, मोबाइल, वाहनांची कागदपत्रे व चाव्या हिसकावून नेल्याची घटना...