Tuesday, November 26, 2024
Homeदेश विदेशचीन : 76 दिवसांनी हटले वुहानमधील लॉकडाऊन

चीन : 76 दिवसांनी हटले वुहानमधील लॉकडाऊन

सार्वमत
बीजिंग – डिसेंबर महिन्याच्या अखेरीस चीनच्या वुहान शहरातून कोरोना विषाणूची सुरुवात झाली होती. आता या विषाणूने संपूर्ण जगात आपले हातपाय पसरवले आहेत. कोरोना विषाणूनेइटली, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, स्पेन, भारत सारख्या देशांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत भारत वगळता या सर्व देशांमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच चीनमधली परिस्थिती आता आटोक्यात आली असून तेथे कोरोनामुळे सोमवारी एकही मृत्यू झाला नाही. त्यामुळे वुहानमध्ये 76 दिवसांनी बुधवारी सकाळी लॉकडाऊन हटवण्यात आला आहे. आता येथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

23 जानेवारीपासून वुहान पूर्णपण सील करण्यात आले होते. इथल्या 50 हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली होती. तर एकट्या वुहानमध्ये अडीच हजार लोकांचा मृत्यू झाला होता. चीनमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूपैकी 80 टक्के मृत्यू हे वुहानमध्ये झाले आहेत. लॉकडाऊन हटवल्यानंतर वुहानमध्ये अडकलेले जवळपास 50 हजार लोक बाहेर पडण्याची आणि आपापल्या घरी परतण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

बुधवारी मध्यरात्री वुहानमधीललॉकडाऊन हटवण्यात आले. तसेच, वुहानमध्ये शहरांतर्गत वाहतूकसेवा आधीच सुरू झाली असताना, बुधवारपासून देशांतर्गत विमान आणि रेल्वेसेवाही सुरू करण्यात येणार आहे. वुहानवर लादण्यात आलेल कठोर निर्बंध उठवण्याचे सरकारने ठरवले असले, तरी शहरातील नागरिकांनी याचा आनंदोत्सव साजरा करू नये, असा सावधगिरीचा इशाराही देण्यात आला आहे. नागरिकांनी सामुदायिक अटींचे पालन करावे, तसेच वाहतूक सुरू झाल्यानंतर पुन्हा नवीन लागण होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही स्थानिक डॉक्टर आणि अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या