नवी दिल्ली | New Delhi
चीन (China) आपल्या कृत्यांपासून परावृत्त होत नाही. चिनी सरकारनं सोमवारी अधिकृतपणे एक नवा नकाशा जारी केला आहे, ज्यामध्ये त्यांनी भारताचा अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) आणि अक्साई चीन (Aksai Chin) हा आपला प्रदेश म्हणून घोषित केला आहे.
चीनने या नव्या नकाशाच्या माध्यमातून या प्रदेशांवर आपला दावा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने अनेकदा अरुणाचल प्रदेश हे भारताचे अविभाज्य अंग असून कायम राहणार आहे असे स्पष्ट केले आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने ट्वीटरवर चीनचे २०२३ चे मानक मानचित्र शेअर केले आहे.
सीबीआयची मोठी कारवाई; पाच कोटींची लाच घेतल्याप्रकरणी सहाय्यक संचालकाला सीबीआयकडून अटक
ग्लोबल टाईम्सच्या रिपोर्टनुसार, नव्या नकाशात भारताच्या काही भागांव्यतिरिक्त चीनने तैवान आणि वादग्रस्त दक्षिण चीन सागराचाही चीनच्या भूभागात समावेश केला आहे. नकाशात चीनने नाइन-डॅश लाईनवर आपला दावा सांगितला आहे. अशा प्रकारे त्यांनी दक्षिण चीन सागराच्या मोठ्या भागावर दावा केला आहे. दरम्यान, व्हिएतनाम, फिलीपिन्स, मलेशिया आणि ब्रुनेई दक्षिण चीन समुद्राच्या क्षेत्रांवर दावा करत आहेत.
नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेसाठी चिनी राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग हे भारत दौऱ्यावर येण्याची दाट शक्यता असून त्याआधीच हा नकाशा जारी करण्यात आला आहे. या नकाशामध्ये केवळ भूभागच नाही तर समुद्रातील सीमाही चीनने वाढवून दाखवल्या आहेत.
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा; ठाकरेंना उत्तर देणाऱ्या कावड यात्रेत फिरवली तलवार
जगभरामध्ये ९- डॅश लाइन नावाने ओळखली जाणारी चीनची समुद्रातील सीमा ही १९४० च्या दशकामध्ये निश्चित करण्यात आली होती. यू आकारातील ही रेषा दक्षिण चिनी समुद्रातील ९० टक्के भाग चीनचा असल्याचा दावा करते. मात्र चीनचा हा दावा संयुक्त राष्ट्र कनव्हेंशनच्या विरोधात आहे.