नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
चीनच्या स्पेस रॉकेटचे (China Space Rocket) अवशेष पृथ्वीवर कोसळणार असल्याची माहिती मिळत आहे. चिनी रॉकेटचा 25 टन वजनी घनकचरा पृथ्वीवर आदळणार आहेत…
रॉकेटचे हे अवशेष चीन (China) आणि भारतासह (India) अमेरिका (America) आणि आफ्रिकेमध्ये (Africa) कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे पृथ्वीवर मोठा धोका निर्माण झाला आहे.
चायना मँड स्पेस एजेन्सीकडून (CMSA) 31 ऑक्टोबरला तियांगोंग स्पेस स्टेशनवरून तिसरे मॉड्यूल लाँग मार्च-5बी हेवी-लिफ्ट रॉकेट लाँच करण्यात आले होते.
हे रॉकेट ठरलेल्या स्पेस ऑरबिटमध्ये पोहोचण्यात अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे चीनचे रॉकेट अनियंत्रित झाले आहे. रॉकेटचे तुकडे पृथ्वीवर कोसळणार आहेत. आता त्याचे अवशेष अंतराळात फिरत असून ते लवकरच पृथ्वीवरील वातावरणाच्या कक्षेत पोहोचणार आहे.
Video : धकाधकीच्या जीवनात शांतता पाहिजे? सुरगाण्यातील ‘या’ ठिकाणी एकदा भेट द्याच
या रॉकेटच्या अवशेषांचे वजन 25 टन असल्याचे समजते. अंतराळ संशोधकांच्या अंदाजानुसार, या रॉकेटचे अवशेष 5 नोव्हेंबर रोजी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतील. त्यानंतर या रॉकेटचे अवशेष भारत, चीन, अमेरिका किंवा आफ्रिका या देशांमधील काही भागांत कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ना पाणी ना जेवण ना झोप…; ‘त्याने’ केला ११ दिवसांत १३ हजार किमीचा प्रवास
या रॉकेटचे अवशेष पृथ्वीवर नेमक्या कुठल्या ठिकाणी कोसळणार आहेत, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी भारत, चीन, अमेरिका, आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.