Thursday, May 22, 2025
Homeनगरचितळे रोड आणि माणिक चौकात दोन तरुणांना गजाने मारहाण

चितळे रोड आणि माणिक चौकात दोन तरुणांना गजाने मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

- Advertisement -

हॉटेलमध्ये जेवणाचे पार्सल आणण्यासाठी गेलेल्या तरुणाला दोघांनी लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केले. कुणाल सुनील भंडारी (वय 29 रा. आनंदनगर, रेल्वेस्टेशन) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भावेश उर्फ बंटी राऊत (रा. माणिकचौक, नगर) व वैष्णव उर्फ भैय्या मंडलीक (रा. पानसरे गल्ली, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बुधवारी रात्री साडेअकरा वाजता चितळे रोडवरील प्रिन्स हॉटेलसमोर ही घटना घडली. भंडारी बुधवारी रात्री साडेअकरा वाजता प्रिन्स हॉटेलमधून जेवणाचे पार्सल घेत असताना तेथे भावेश व वैष्णव आले व ते कुणाल भंडारीला म्हणाले,‘तू खूप फेमस झाला आहे, तू फैजानच्या मर्डरमध्ये का पडला’, असे म्हणत त्यांनी कुणालला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लोखंडी गजाने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान प्रिन्स हॉटेलसमोर झालेल्या मारहाणीचा राग मनात धरून रोहित प्रविण चंगेडीया (वय 31 रा. आदर्श कॉलनी, बुरूडगाव रोड) यांच्यासह कुणाल भंडारी यांना भावेश राऊत आणि वैष्णव मंडलीक यांनी माणिक चौकात अडविले. प्रिन्स हॉटेलमध्ये भांडण का केले असे म्हणत, भावेश व वैष्णव यांनी रोहित चंगेडीया यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. याप्रकरणी चंगेडीया यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भावेश व वैष्णव विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मोठी बातमी! नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधिक्षकपदी बाळासाहेब पाटील यांची नियुक्ती

0
नाशिक | Nashik नाशिक ग्रामीणच्या पोलिस अधिक्षकपदी पालघर जिल्ह्याचे पाेलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सविस्तर...