Saturday, April 26, 2025
Homeजळगावचोपड्यात गावठी बनावटीचे दोन कट्टे, जिवंत काडतुसे जप्त

चोपड्यात गावठी बनावटीचे दोन कट्टे, जिवंत काडतुसे जप्त

चोपडा – Chopda – प्रतिनिधी :

नाशिक जिल्ह्यातील दोन जण तर चोपड्यातील एक जण मध्यप्रदेश राज्यातून गावठी बनावटीचे शस्रे खरेदी करून शहरात येत असल्याची गोपनीय माहिती एलसीबी व स्थानिक पोलिसांना मिळाल्याने ,

- Advertisement -

पोलिसांच्या संयुक्त पथकाने सापळा लावून शहराच्या गावाबाहेर चुंचाळे रस्त्यावर तिघांना दोन गावठी बनावटीचे कट्ट्यासह जिवंत काडतुसे जप्त केल्याची धडक कारवाई शनिवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

जळगाव येथील एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंह चव्हाण यांना नाशिक जिल्ह्यातील दोन जण तर चोपड्यातील एक जण असे तीन जण मध्यप्रदेशातून गावठी बनावटीचे दोन कट्ट्यासह जिवंत काडतुसे घेऊन शनिवारी दुपारी 3 वाजता शहरात येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने ,

पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे,चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे,उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाने एलसीबीचे सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील, पो.हे.कॉ.सुधाकर आंबोरे, पो.हे.कॉ.अश्रफ निजामोद्दीन शेख, नरेंद्र वारुळे, पो.ना. दीपक पाटील, पो.ना.मुरलीधर बारी, पो.कॉ. दीपककुमार शिंदे, पो.ना.प्रमोद लाडवंजारी, पो.कॉ.किरण धनगर, पो.कॉ.दर्शन

तसेच शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार जगदेव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तुरनर, पो.हे.कॉ. सुनील पाटील, पो.ना.प्रदीप राजपूत, पो.ना.संतोष पारधी, पो.ना.ज्ञानेश्वर जवागे, पो.कॉ.हेमंत कोळी, पो.ना.जयदीप राजपूत, पो.कॉ.प्रमोद पवार, पो. कॉ.रवींद्र पाटील यांची दोन पथकात विभागणी करून सापळा रचून शहरातील सुंदरगढीच्या कोपर्‍यावर चुंचाळे रस्त्यावर सार्वजनिक शौचालयाजवळ विना क्रमांकाची पल्सर मोटरसायकलवर येत असलेले

आकाश माधव सानप (वय24) रा.चिंचोल ता सिन्नर जि.नाशिक, महेश निवृत्त सानप (वय 24) रा.वडगांव पिगंळा ता. सिन्नर जि.नाशिक यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

यावेळी संबंधितांची झाडाझडती घेतली असता त्यांचेकडून 25,000/ रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा एक कट्टा (पिस्तूल) व 4,000/-रुपये किंमतीचे जिवंत काडतुसे असा 29,000/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली.

या प्रकरणी पो.कॉ.दीपककुमार शिंदे यांच्या फिर्यादी वरुन आकाश माधव सानप (वय 24) रा.चिंचोल ता सिन्नर जि नाशिक 2) महेश निवृत्त सानप (वय 24) रा.वडगांव पिंगळा ता.सिन्नर जि. नाशिक यांचेविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम 3,5,25,(1), (अ) 7/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

तसेच पोलिसांच्या दुसर्‍या पथकाने शहरातून जाणार्‍या चुंचाळेरोडवर स्माशनभुमीजवळ सापळा रचून मध्यप्रदेशातून मोटर सायकल क्रमांक-19 डी एच 4054 वरून शहरात येत असलेला मयुर काशिनाथ वाकडे (वय 22) रा. अरुणनगर चोपडा यास पोलिसांच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

यावेळी त्याची झाडाझडती घेतली असता त्याचेकडून 25,000/ रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा एक कट्टा (पिस्तूल) व 2,000/-रुपये किंमतीचे जिवंत काडतुसे असा 27,000/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून अटक केली. या प्रकरणी पो.कॉ.प्रकाश देवसिंग मथुरे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला मयुर काशिनाथ वाकडे (वय 22) रा.अरुणनगर चोपडा याचे विरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम 3,5,25(1), (अ), 7/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही गुन्हयातील तिघांचा पूर्व इतिहास पडताळण्यात आला असून,त्यांचे विरुध्द शहर पोलीस स्टेशन व सिन्नर एमआयडीसी पो.स्टे.अंबड या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या