Tuesday, March 25, 2025
Homeमनोरंजनप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका

मुंबई | Mumbai

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझाला आज दुपारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, रेमो डिसूझावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. त्याची पत्नी लीजेल त्याच्याबरोबर आहे. रेमो डिसूझा नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांच्या उत्तम नृत्य दिग्दर्शनासाठी आणि ‘फालतू’ आणि ‘एबीसीडी’ चित्रपटांसाठी ओळखले जातात.

रेमो डिसूझाने अनेक हिट चित्रपटांची गाणी कोरिओग्राफ केली आहेत. यानंतर ते डान्स इंडिया डान्सचे जज होते. यशस्वी नृत्यदिग्दर्शक झाल्यावर त्यांनी दिग्दर्शनासाठीही प्रयत्न केला आणि फालतू चित्रपटाचे दिग्दर्शन केले. यानंतर 2013 मध्ये त्यांनी ‘एबीसीडी’ हा डान्सवर आधारित चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटनंतर त्यांनी 2015 मध्ये एबीसीडी 2 प्रदर्शित केला. या चित्रपटात वरुण धवन, श्रद्धा कपूर आणि प्रभुदेवा मुख्य भूमिकेत होते.

कोरिओग्राफी आणि चित्रपटाच्या दिग्दर्शनाशिवाय रेमो डिसूझा एक यशस्वी जज देखील आहेत. डान्स इंडिया डान्ससोबतच ते कलर्सच्या शो झलक दिखलाजा आणि स्टार प्लस ‘डान्स प्लस’वर जज म्हणून त्यांनी उत्तम काम केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...