Friday, June 19, 2026
HomeनगरShirdi : नाताळ सुट्टीमुळे साईनगरीत भक्तांचा महासागर

Shirdi : नाताळ सुट्टीमुळे साईनगरीत भक्तांचा महासागर

पोलीस अन् संस्थानच्या हायटेक नियोजनाने दर्शनाचा मार्ग सुकर

शिर्डी | Shirdi

नाताळची सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप आणि 2026 च्या स्वागताचा उत्साह यामुळे शिर्डीत सध्या जगभरातून लाखो साईभक्तांची मांदियाळी लोटली आहे. या अथांग गर्दीतही भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी शिर्डी पोलीस प्रशासन आणि साई संस्थानने राबवलेल्या मास्टर प्लॅनमुळे भाविकांचा शिर्डी प्रवास सुखकर होत आहे. प्रशासनाच्या या उत्कृष्ट नियोजनाचे साईभक्तांकडून कौतुक केले जात आहे.

- Advertisement -

वाढती गर्दी लक्षात घेऊन 25 डिसेंबरपासून नगर-मनमाड रस्त्यावरील पिंपळवाडी चौक ते लक्ष्मीनगर हा 200 मीटरचा परिसर पूर्णपणे नो व्हेईकल झोन घोषित करण्यात आला आहे. पिंपळवाडी चौक, लक्ष्मीनगर आणि कानकुरी रोड हे मार्ग सिमेंट ब्लॉक लावून बंद केल्याने भाविकांना रस्त्यावरून मोकळेपणाने वावरता येत आहे. रस्त्यावर अनधिकृतपणे पार्क होणारी वाहने आता थेट वाहनतळावर पाठवली जात असून, कोपरगाव नाका आणि साईप्रसादालय परिसरात मोठा फौजफाटा तैनात आहे.

सुरक्षेची धुरा जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे सांभाळली जात आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती स्वतः आरसीपी प्लाटूनसह रस्त्यावर उतरून पेट्रोलिंग करत आहेत. शहरात 200 पोलीस कर्मचारी आणि 250 होमगार्ड असा एकूण 450 जणांचा ताफा तैनात असून, पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे व वाहतूक शाखेचे महेश येसेकर अहोरात्र परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
साई संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर आणि त्यांच्या टीमने यंदा गर्दीच्या नियोजनात मोलाची भर घातली आहे.

विशेष म्हणजे, दरवर्षी गर्दी वाढल्यावर खबरदारी म्हणून जनसंपर्क कार्यालय बंद ठेवले जात असे, मात्र यंदा ते सुरू ठेवल्याने भाविकांना माहिती मिळणे सोपे झाले आहे. ठिकठिकाणी बॅरिकेटिंग केल्यामुळे दर्शनाची रांग कोठेही न थांबता सातत्याने प्रवाहित राहत आहे. एकूणच पोलीस प्रशासन आणि साई संस्थान यांच्यातील अचूक समन्वयामुळे शिर्डीत येणार्‍या प्रत्येक साईभक्ताचा दर्शनाचा अनुभव यंदा अधिक सुखद आणि सुरक्षित ठरत आहे.

ताज्या बातम्या

Crime News : बनावट सह्या करून 88 लाखांचे कर्ज

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar भागीदारी संस्थेच्या कागदपत्रांवर बनावट सह्या करून एका व्यावसायिकाला भागीदार दाखवत त्याच्या नावाचा वापर करून 88 लाख रूपयांचे वाहन कर्ज उचलल्याचा धक्कादायक प्रकार...