Wednesday, November 20, 2024
Homeदेश विदेशनिर्भया बलात्कार प्रकरणाचा घटनाक्रम

निर्भया बलात्कार प्रकरणाचा घटनाक्रम

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. दरम्यान, आज निर्भया सामुहिक बलात्कारप्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने याप्रकरणातील चारही आरोपींविरोधात डेथ वॉरंट जारी केले आहे.

या चारही आरोपींची फाशी कायम ठेवण्यात आली असून २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता त्यांना फाशी देण्यात येणार आहे. या सुनावणीवेळी सर्व आरोपी व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे हजर होते.

- Advertisement -

मे २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने १२०० पानांचे आरोपपत्र, ८६ साक्षीदारांची साक्ष आणि २४३ दिवसांच्या सुनावणीनंतर निर्भयाच्या सर्व मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.

निर्भया केसचा घटनाक्रम 

  • २३ वर्षांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीवर धावत्या बसमध्ये एका अल्पवयीन मुलासह सहा जणांनी अत्याचार केला होता.
  • बसचालक राम सिंह आणि अन्य दोघांना अटक झाली.
  • या घटनेविरोधात मध्य दिल्लीत निदर्शने करण्यात आली. निदर्शकांची पोलिसांसोबत झटापट झाली. याच दिवशी चौथ्या आरोपीलाही अटक करण्यात आली होती.
  • या प्रकरणातील दोन आरोपींना दिल्लीतील न्यायालयात हजर केले. त्यातील विनय या आरोपीने आपल्याला फासावर लटकवण्यात यावे, अशी विनंती न्यायालयाकडे केली.
  • या प्रकरणातील पाचवा आणि अल्पवयीन आरोपीला पूर्व दिल्लीतील आनंदविहार परिसरातून अटक केली. तो उत्तर प्रदेशातील मूळ गावी पसार होण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. याच दिवशी सहावा आरोपी अक्षय कुमार सिंह याला बिहारमधून अटक केली.
  • पीडितेने दंडाधिकाऱ्यांसमोर आपला जबाब नोंदवला गेला.
  • दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी जलदगती न्यायालयाची स्थापना केली गेली.
  • सरकारने या प्रकरणात जलद सुनावणी आणि कठोर शिक्षेसाठी कायद्यात सुधारणांसाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
  • पीडितेला उपचारांसाठी सिंगापूर येथे नेण्यात आले.
  • सिंगापूरमधील रुग्णालयात पीडितेचा मृत्यू
  • पीडितेचे पार्थिव दिल्लीत आणून अंत्यसंस्कार करण्यात आले.
  • पाच आरोपींविरोधात गुन्हे दाखल
  • न्यायालयाने ‘क्लोज डोअर’ सुनावणी घेण्याचे आदेश दिले.
  • बाल न्यायालयाने एका आरोपीला अल्पवयीन ठरवले
  • न्यायालयाने तात्काळ सुनावणी प्रक्रिया सुरू केली. पाचही आरोपींवर हत्या आणि इतर आरोप निश्चित
  • गुन्हेगारी कायदा (सुधारित) अध्यादेश, २०१३ जारी, कठोर कायद्यासाठी प्रासंगिक विधेयक लोकसभेत १९ मार्च आणि राज्यसभेत २१ मार्च रोजी मंजूर करण्यात आला.
  • न्यायालयात सुनावणी सुरू झाली आणि आरोपींचे जबाब नोंदवून घेतले
  • एका आरोपीने तिहार तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली.
  • पीडितेच्या आईने न्यायालयात मुलीला न्याय दिला जावा, अशी मागणी केली.
  • १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
  • नवी दिल्लीत बाल न्यायालयाने अल्पवयीन आरोपीसंदर्भात निकालाची तारीख पुढे ढकलून २५ जुलै निश्चित केली.
  • सर्वोच्च न्यायालयाने बाल न्यायालयाला निकाल घोषित करण्याची परवानगी दिली.
  • न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला तीन वर्षे सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले.
  • दिल्लीच्या न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला.
  • मुकेश, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय कुमार सिंह या चारही आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले.
  • शिक्षेवर युक्तिवादानंतर निकाल राखून ठेवला.
  • चारही दोषींना दिल्लीच्या साकेत न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.
  • साकेत न्यायालयाच्या या निर्णयाला दोषींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयानेही साकेत न्यायालयाने दोषींना सुनावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली.
  • दोषींनी उच्च न्यायालयाच्या निर्णयालाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर सुनावणी सुरू होती. आज, ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली.
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या