नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक शहराची प्रमुख वाहतुकीची सुविधा असलेल्या सिटी लिंक (Citilinc) बसचा संप सकाळपासून सुरू झाल्याने नागरिकांची मात्र धांदल उडाली आहे. या संपामुळे रिक्षा व भाडोत्री वाहन चालकांची चंगळ झाल्याचे दिसून येत आहेे. ठीक ठिकाणी दाम दुपटीचे भाडे देऊन नागरिकांना प्रवास करावा लागला असल्याचे चित्र आहे.
नाशिक शहरात शहर बस वाहतूकीसाठी २५० बसेस आणि ८०० कर्मचारी कार्यरत आहेत. या माध्यमातून शहराच्या विविध भागांमध्ये 2,540 बस फेर्याद्वारे हजारो नाशिककर प्रवास करीत असतात. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून या बस वाहकांना वेतन न मिळाल्यामुळे मंगळवारी सकाळपासून सिटी लिंक बस वाहकांनी संप सुरु केला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावरून एकही बस धावली नाही. सिटीलिंकच्या सेवेची सवय झालेल्या नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागल्याने खाजगी वाहनांच्या भाड्यांमध्ये दुप्पट तिप्पट भाडे वाढ केल्याचे दिसून आले.
निफाड तालुक्यातील जवानाचे अपघाती निधन
दरम्यान मनपा आयुक्त भाग्यश्री बानायत दिल्ली दौर्यावर असून, अतिरिक्त आयुक्त व सिटी लिंकचे मुख्य समन्वयक प्रदीप कुमार चौधरी हे देखील मुंबई येथे पावसाळी अधिवेशनाला गेलेले असल्यामुळे याबाबतचा निर्णय प्रलंबित होता. मुख्य समन्वयक मिलींद बंड यांचा त्याच्याशी दुरध्वनीवरुन संवाद साधण्याचा प्रयत्न सुरु आहे.
नगरमधील ‘मर्डर’ विधीमंडळात गाजला