Tuesday, December 10, 2024
HomeनाशिकNashik News : सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच; विद्यार्थी, चाकरमान्यांचे मोठे...

Nashik News : सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच; विद्यार्थी, चाकरमान्यांचे मोठे हाल

नाशिक | Nashik

कालपासून नाशिक शहराची प्रमुख वाहतुकीची सुविधा असलेल्या सिटीलिंक (Citilinc) बसच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ठेकेदाराने वाहकांना दोन महिन्यांचे वेतन न दिल्याने सिटीलिंकच्या वाहकांनी कामबंद आंदोलन पुकारले असून आज सलग दुसऱ्या दिवशीही सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे…

- Advertisement -

Nashik : भाजपमध्ये मोठे फेरबदल; शहराध्यक्षपदी प्रशांत जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बच्छाव, वाघ यांची नियुक्ती

काल दिवसभर सिटीलिंक व्यवस्थापन आणि ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होऊन देखील त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज पुन्हा चालक आणि वाहकांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनाचा नाशिककरांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत असून रिक्षा व भाडोत्री वाहन चालक जादा भाडे आकारून प्रवाशांची लुट करतांना दिसून येत आहे.

Rain Alert : पावसाचा जोर आणखी वाढणार! मुंबई-पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

दरम्यान, वर्षभरापूर्वी नाशिक शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून सिटीलिंक बससेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र पगार वेळेवर मिळत नसल्याने गेल्या पाच सहा महिन्यांपासून सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांकडून सातत्याने कामबंद आंदोलने केली जात आहेत. त्यानंतर कालपासून सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांकडून पुन्हा एकदा कामबंद आंदोलन (Protest) पुकारण्यात आल्याने विद्यार्थी आणि चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या