Friday, May 31, 2024
Homeमुख्य बातम्यासिटीलिंक सेवकांचा संप मिटला

सिटीलिंक सेवकांचा संप मिटला

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सिटिलिंक व्यवस्थापन व ठेकेदार यांच्यातील चर्चेला आज रविवारी यश आल्याने मागील तीन दिवसांपासून ठप्प असलेली शहर बससेवा सोमवारपासून (दि.७) पुन्हा पुर्ववत सुरु होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान वेळेवर वेतन न मिळाल्यास पुन्हा संपाचे हत्यार उपसले जाईल, असा इशारा बैठकीत सेवकांनी दिल्याचे कळते.

- Advertisement -

जून व जुलैचे असे दोन महिन्यांचे वेतन थकल्याने मागील शुक्रवारी (दि.४) सिटिलिंक बससेवा वाहकांनी अचानक कामबंद केले होते. त्यामुळे मनपा प्रशासन,सिटिलिंक व्यवस्थापनाची तारांबळ उडाली होती. लाईफलाईन थांबल्याने सर्वाधिक फटका, चाकरमाने, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना बसला होता.मात्र, आता संप मिटल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या