Monday, June 17, 2024
Homeनगरवाढते तापमान त्यात खंडीत विजेमुळे नागरिक हवालदिल

वाढते तापमान त्यात खंडीत विजेमुळे नागरिक हवालदिल

कुकाणा |वार्ताहर| Kukana

- Advertisement -

संपूर्ण महाराष्ट्रात चालू उन्हाळ्यात तापमान व उष्णतेमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कासावीस होत कंटाळवाणे जीनं जगत आहे. त्यातून सुटका करण्यासाठी काही अंशी पंखे, कुलर, मदतीला धावून येतात, पण दिवस दिवस भर जर विजच नसल्याने लहान थोरांबरोबर वयस्कर व्यक्ती व आजारी लोकांना तर तडफडत रहावं लागतं.

सध्या तपमानात एवढी मोठी वाढ झाली असून सकाळपासूनच उकाडा सुरू होतो, तो संध्याकाळपर्यंत असह्य करत जातो. सावलीत बसलं तरी तिव्र झळायांनी अंगाची नुसती लाही लाही होते. सारख्या आलेल्या घामानं जीव घुसमटल्यागत होवून माणसं अगदी घाबरे होतात. अशावेळी विजेची मदत सुखावह वाटते. पंखा, कुलर लावून कमीत कमी घालमेल होण्यापासून सुटका तरी होते, पण आई भिक मागू देईना अन् बाप पोट भरू देईना या उक्तीप्रमाणे सध्याचं वातावरण निर्माण झालं. कधी दिवसभर तर कधी पहाटेपासून विज गायब होते. आता पाणी कमी झाल्याने शेतीच्या विजेचा वापरही खूप कमी झालेला असताना व भारनियमन नसताना नेहमी विजेचा लपंडाव होण्याचे कारण काय आहे? असा प्रश्न पडतो.

बरं कुणाला काही माहिती नसतं, की गेली लाईट, मग ये घराच्या बाहेर जा घरात असं करता करता, अन आता येईल मग येईल म्हणून वाट बघता बघता जिवाची लाहीलाही होते. याला जबाबदार कोण? नेहमीच वातावरण आणि सध्याच वातावरण यात जमीन अस्मानाचा फरक आहे. किमान या असह्य उकाड्यात तरी विज पुरवठा व्यवस्थित देणं गरजेचं आहे. कारण उष्माघाताचे प्रमाणात वाढ होत असून याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अन्यथा याचे खूप दुष्परिणाम भोगावे लागतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या