नवी दिल्ली – नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात आसामसह ईशान्येकडील राज्यात हिंसाचाराचे उफाळलेला असून, आता हा आक्रोश नवी दिल्लीतही पोहचला आहे. रविवारी दुपारी आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करत तीन बस पेटवून दिल्या. या घटनेनंतर मथुरा रोड परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.
नागरिकत्व कायदा दुरूस्तीनंतर आसाम, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीमसह सात राज्यात प्रचंड तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. हे विधेयक संसदेत मांडल्यानंतर याविरोधात रोष व्यक्त व्हायला लागला होता. कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर हिंसाचार उफाळून आला.