सातपूर । प्रतिनिधी Satpur
कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी कामगारविरोधी, देशविरोधी, मोदी धोरण हटाव, देश बचाव, ही घोषणा देत बुधवारी (दि.9) क्रांतीदिनी नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या मोर्चाच्या माध्यमातून कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करणे, कायम नसलेल्या सर्व कामगार कर्मचार्यांना कायम करणे, सर्वांना 26 हजार रुपये दरमाह किमान वेतन लागू करणे, असंघटित कामगारांना सेवा शर्ती व सामाजिक सुरक्षा सर्व ज्येष्ठ नागरिकांना किमान दहा हजार रुपये दरमाहा पेन्शन व निम सरकारी कर्मचार्यांना जुनी पेन्शन लागू करणे, महागाई कमी करणे, बेरोजगारांना ‘काम नाही तर बेरोजगार भत्ता’ लागू करण्याच्या प्रमुख मागण्यासांठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
कामगारांनी आपल्या वस्तीत व कंपनीमध्ये याचा प्रसार व प्रचार करण्यासोबतच जास्तीत जास्त संख्येने दुपारी 1 वाजता गोल्फ क्लब येथे मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत, असे आवाहन शिप्रा कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आयोजित गेट मिटिंगमध्ये कॉ. सीताराम ठोंबरे व नागेश यांनी केले.