Saturday, May 4, 2024
Homeनगरशहर पोलिसांची नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई

शहर पोलिसांची नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

नायलॉन मांजा विक्री करण्यास बंदी असतानाही मकरसंक्रातीच्या दिवशी नायलॉन मांजा विक्री करणार्‍या एकाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.

- Advertisement -

अजय बाबासाहेब राऊत (वय 32 रा. प्रेमदान हडको) असे ताब्यात घेतलेल्या दुकानदाराचे नाव आहे. शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

राऊत याच्याकडून 15 हजार रूपयांच्या 50 नायलॉन मांज्याच्या चकर्‍या, 9 हजार रूपये किंमतीच्या तीन लाकडी मशीन, 26 हजार 580 रोख रक्कम असा 26 हजार 604 रूपयांचा मुद्देमाल जप्त केली आहे.

शहर पोलीस उपअधीक्षक विशाला ढुमे यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी सागर द्वारके, सलीम शेख, ओव्हळ, खंडागळे, फसले यांच्या पथकाने ही कारवाई केली. तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुरूवारी तीन ठिकाणी कारवाई करून तीन हजार 100 रूपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या