Monday, May 27, 2024
HomeUncategorizedनगर ते औरंगाबाद गॅस लाइनचे काम युद्धस्तरावर

नगर ते औरंगाबाद गॅस लाइनचे काम युद्धस्तरावर

औरंगाबाद – Aurangabad

शहरात सीएनजी पंप (CNG pump) सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेंद्रासह अन्य भागांत तीन पंप सुरू करण्यात आले असून, आगामी महिनाभरात वाळुज रोडसह पैठण रोड येथे तीन पंपावर सीएनजी इंधन (CNG fuel) देण्याची व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. आगामी वर्षभरात सीएनजी गॅस (CNG gas) पाइपलाइनद्वारे देण्याचे लक्ष्य असल्याची माहिती ‘बीजीआरएल’ कंपनीकडून देण्यात आली.

- Advertisement -

औरंगाबाद शहरात सीएनजी इंधन मिळावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर शहरात सीएनजी पंप देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी काही पंपांची निवडही करण्यात आली आहे. भारत पेट्रोलियम कंपनीच्या ‘बीजीआरएल’ कंपनीकडून गॅस वितरण करण्यात येणार आहे. यासाठी नगर ते औरंगाबाद या दरम्यान पाइपलाइन टाकण्याचे काम वेगात सुरू आहे. औरंगाबाद शहरात पेट्रोलियम गॅसही पाइपलाइनद्वारे देण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी शहरात काही भागांमध्ये पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. सध्या मुख्य वाहिनीचे काम सुरू आहे. गॅस वाळुज भागातील कंपन्यांनाही दिला जाणार आहे. यामुळे कंपन्यांना निरंतर गॅसचा पुरवठा केला जाणार आहे.

शहरातील शेंद्रा भागात दोन सीएनजी पंप सुरू करण्यात आले आहेत. आगामी महिन्यात वाळुज मार्गावर दोन आणि वाळुज लिंक रोडवर पैठण रोड येथे सीएनजी पंप सुरू करण्यात येणार आहे. सध्या सीएनजीचा पुरवठा हा टँकरद्वारे करण्यात येत आहे. टँकरद्वारे सीएनजी पुरवठा हा महागात पडत आहे. आगामी काळात सीएनजी इंधनाचा निरंतर पुरवठा व्हावा, यासाठी पाइपलाइनद्वारे इंधन पुरवठा करण्याचे नियोजन आहे. आगामी वर्षभरात पाइपलाइनचे काम पूर्ण होताच, सीएनजी देण्यात येणार आहे. त्या आधी शहरातील काही पेट्रोल पंपांद्वारे सीएनजीचा पुरवठा करण्यात येणार आहे.

नगर ते औरंगाबाद दरम्यान गॅस लाइनचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. हा महत्त्वाचा प्रकल्प औरंगाबादसाठी आहे. शहरातही पाइपलाइनद्वारे गॅस वितरण करण्यात येणार आहे. याबाबत सर्व प्रक्रिया करण्यात आली आहे. शहरातील वाहनधारकांना सीएनजीचा अखंड पुरवठा व्हावा, यासाठी हे काम वेगात करण्याचा आमचा मानस आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या