Saturday, May 4, 2024
Homeनाशिकसिव्हील, कोव्हीड रुग्णालयाच्या लिफ्ट बंद

सिव्हील, कोव्हीड रुग्णालयाच्या लिफ्ट बंद

नाशिक । Nashik

गेली तीन दिवसांपासून जिल्हा शासकीय रूग्णालय तसेच येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या कोविड रूग्णालय अशा दोन्ही ठिकाणच्या लिफ्ट बंद असून रूग्णांना स्ट्रेचरसह उचलून नेहण्याची वेळ आली आहे. यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांंमधून संताप व्यक्त होत आहे.

- Advertisement -

जिल्हा शासकीय रूग्णालय जिल्हाभरातील रूग्णांसाठी महत्वाचा आधार आहे. यामुळे विविध आजराने त्रस्त रूग्ण नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून तसेच इतर जिल्ह्यातूनही येथे रूग्ण दाखल होत असतात. यामुळे येथे रूग्णांची सातत्याने गर्दी असते. प्रामुख्याने गंभीर रूग्णांवर शस्त्रक्रिया तसेच त्यांंना उपचारांर्थ दाखल करून घेण्यासाठी पहिल्या, तिसर्‍या तसेच चौथ्या मजल्यावर व्यवस्था आहे. त्यांना घेऊन जाण्यासाठी रूग्णालयात दोन लिफ्ट कार्यरत होत्य. यातील एक लिफ्ट अनेक वर्षांपासून बंद आहे.

तर एकमेव सुरू असलेली लिफ्टही गेली तीन दिवसांपासून बंंद झाली आहे. ंगंभीर रूग्णांना पायर्‍या चढून तीसर्‍या मजल्यापर्यंत जाणे अश्यक आहे. अशावेळी येथील आरोग्य सेवक कर्मचारी रूग्णांच्या नातेवाईकांच्याच मदतीने स्ट्रेचरसह रूग्णांना उचलून वरती नेत आहेत. हे करताना सर्वांची मोठी दमछाक होत आहे. अशा प्रकारात रूग्ण दगावण्याची शक्यता व्यक्त असून रूणांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे.

असाच प्रकार जिल्हा रूग्णालयातील कोविड रूग्णालयातही झाला सून तेथीलही लिफ्ट बंद पडली आहे. यामुळे करोना पॉझिटिव्ह रूग्णांना धोकादायकपणे पायर्‍यांवरून वरती घेऊन जावे लागत आहे. याचा इतरांन संसर्ग होण्याची भिती व्यक्त होत आहे. करोना विषाणुच्या साथीच्या काळातही लिफ्ट बाबत हलगर्जीपणा दाखवल जात असल्यने सर्वस्तरातून संताप व्यक्त होत आहे.

शासकीय रूग्णलयांतील लिफ्ट दुरूस्तीचे काम शासकीय बांधकाम विभागाकडे आहे. या विभागास पत्रव्यवहार करण्यात आलेला असल्याचे जिल्हा रूग्णालय प्रशासनने स्पष्टकेले आहे. मात्र साथीच्या काळातही महत्व बांधकाम विभागाला नाही काय असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी रूग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या