Monday, April 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजअकोल्यामध्ये दोन गटात तुफान राडा; दगडफेक, अन् वाहनांची जाळपोळ

अकोल्यामध्ये दोन गटात तुफान राडा; दगडफेक, अन् वाहनांची जाळपोळ

अकोला | Akola
अकोल्यात दोन गटात मोठा राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. दोन गटाने एकमेकांवर दगफेक करत मोठ्या प्रमाणात जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. ही घटना अकोल्यातील हरीपेठ भागात घडली आहे. राड्या दरम्यान झालेल्या दगडफेकीमध्ये नागरिक जखमी झाले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.

अकोल्यात दोन गटात मोठा राडा झालाय. शहरातील हरिहर पेठमध्ये दोन गटात मोठा राडा झाला. यावेळी रिक्षा आणि दुचाकीदेखील जाळण्यात आल्या आहेत. तसेच दगडफेक देखील झाली आहे. विशेष म्हणजे अतिशय किरकोळ आणि शुल्लक कारणावरुन वाद झाला. हा वाद इतका टोकाला पोहोचला की दोन गटात तुफान राडा झाला. या राड्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न संबंधित परिसरात निर्माण झाला होता. पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा संबंधित परिसरात आहे. घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. हरिहर पेठमध्ये रिक्षा आणि बाईकची धडक झाली. या धडकेमुळे किरकोळ वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यावसन मोठ्या राड्यात झाले. हे भांडण इतके वाढले की दोन गट आमनेसामने आले. त्यामुळे घटनास्थळावर अक्षरश: गाड्या जाळण्यात आल्या. दोन्ही बाजूने तुफान दगडफेक देखील झाली. या दगडफेकीत ३ ते ४ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच एक रिक्षा आणि तीन दुचाकी जाळण्यात आल्या आहेत. यामुळे चारही वाहने जळून खाक झाली आहेत.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. येथे ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळत आहे. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अतिरिक्त पोलीस तुकडी मागवल्याचंही सांगण्यात येत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...