Monday, May 20, 2024
Homeधुळेशेती वाटणीच्या वादातून हाणामारी ; आठ जणांवर गुन्हा

शेती वाटणीच्या वादातून हाणामारी ; आठ जणांवर गुन्हा

धुळे । प्रतिनिधी dhule

शेती वाटणीच्या वादातून तालुक्यातील सावळी गावात हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत साहेबराव लक्ष्मण मराठे (रा.चिंचखेडा, ता.धुळे) या शेतकर्‍याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.15 जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गोरख हिरामण मराठे, महारू हिरामण मराठे, अशोक हिरामण मराठे, दिपक अशोक मराठे सर्व (रा.चिंचखेडा) यांनी संगणमत करून शेती वाटणीच्या कारणावरून वाद घातला. यात गोरख मराठे याने त्याच्या हातातील पावडीने डोक्यावर मारल्याने डोके फुटले. तर विनोद मराठे याच्या पायाला मारल्याने तो जखमी झाला. त्यावरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात वरील चौघांविरूध्द गुन्ह्या दाखल झाला आहे. पुढील तपास पोना.योगेश पाटील करीत आहेत.

तर परस्परविरोधात गोरख हिरामण मराठे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शेती वाटणीच्या कारणावरून निलेश संजय जगताप, साहेबराव लक्ष्मण मराठे, सचिन संजय जगताप, राकेश संजय जगताप सर्व (रा.चिंचखेडा) यांनी मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यात सचिन जगताप याने लोखंडी सळईने डोक्यावर वार केला. तसेच पुतण्या अविनाश याला मारहाण करून जखमी केले. त्यावरून चौघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या