तळोदा Taloda। ता.प्र.-
येथील शेठ के.डी.हायस्कूलमध्ये (Sheth K. D. High School) सन 1990 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीत (class X) असलेल्या विद्यार्थ्यांचे (students) स्नेहमीलन (Sneha Meelan) व गुरुजन सन्मान सोहळा (Gurujan honor ceremony) नुकताच पार पडला.
तळोदा तालुक्यातील सर्वात जुनी आणि सर्वात नामांकित शाळा म्हणजे शेठ के.डी.हायस्कुल. या शाळेने हजारो विद्यार्थी घडवले आहेत. समाजातील विविध क्षेत्रात हे विद्यार्थी यशस्वी वाटचाल करीत आहेत.
1990 ला दहावीला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल 32 वर्षानंतर शाळेत येऊन सर्व विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेहमीलन कार्यक्रम आयोजित केला होता. सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पयहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर दिवंगत शिक्षक व वर्ग मित्र यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक के.एस.पाटील, पी.के. रघुवंशी, एल.एच.पाटील, बी.के.पाटील, व्ही.एम.पाटील, ए.व्ही.कलाल, डी.सी.पाटील, आर.एस.पाटील, ए.व्ही.वाणी, डी.ओ.भोई, एस.जी.चित्ते, बी.डी.कलाल, श्रीमती के.आर.मगरे, श्रीमती एस.एस.कलाल आदी उपस्थित होते.विद्यार्थिनीच्या हस्ते गुरूंचे औक्षण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.एस.पाटील होते. महाराष्ट्रासह इतर ठिकाणी असलेले सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली यात विद्यार्थिनींचाही मोठा उत्साह होता. सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय देतांना सध्या आपण काय करत आहोत याबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रातील यश बघून शिक्षक वृदांनी समाधान व आनंद व्यक्त केला.
प्रमुख अतिथी म्हणून शेठ के.डी.हायस्कूलचे विद्यमान मुख्याध्यापक जितेंद्र सुर्यवंशी व शिक्षक वृंद होते. शिक्षकवृंदाने अतिशय भारावलेल्या मनाने मनोगत व्यक्त केले. त्यानंतर स्नेहभोजनानंतर स्नेहमिलनाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कौशल सवाई, विनय जैन, शब्बीर मन्सूरी, हुकुम जैन, नितीन शिंपी, निलेश सूर्यवंशी, नरेंद्र माळी, अजय सोनवणे, डॉ.शिरीष शिंदे, डॉ.गणेश पाटील, विजय सोनवणे, अतुल कर्णकार, मनीष कलाल, दिनेश गवळी व सर्व मित्र मंडळीनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक धनंजय कलाल यांनी केले. आभार नितीन शिंपी यांनी मानले.