Tuesday, May 28, 2024
Homeनगरकपड्यांच्या सेलमध्ये चोरी करणार्‍या चार महिला पकडल्या

कपड्यांच्या सेलमध्ये चोरी करणार्‍या चार महिला पकडल्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील केशर गुलाब मंगल कार्यालयात लावलेल्या कपड्यांच्या सेलमध्ये (Clothes Sale) चोरी (Theft) करणार्‍या चार महिलांना (Women) कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) ताब्यात घेतले आहे. सेल मधील एका स्टॉलमधून चोरी (Theft) केलेले 58 हजार रूपये किमतीचे कपडे हस्तगत केले आहे. मंगल कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व तांत्रिक विश्लेषण करून कोतवाली पोलिसांनी चार महिला संशयित आरोपी (Accused) निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

सकल हिंदूंचा नगरमध्ये मोर्चा

नंदा विलास इंगळे, शितल रवी भुजंग, पुजा अविनाश काकडे (सर्व रा. सिध्दार्थनगर, झोपडपटटी), नंदा अरूण घोडके (रा. भोसले आखाडा) अशी चोरी (Theft) करणार्‍या महिलांची नावे आहेत. केशर गुलाब मंगल कार्यालयात कपड्यांच्या सेलमध्ये (Clothes Sale) लावलेल्या स्टॉल मधून कपड्यांची चोरी (Clothes Theft) झाल्याची फिर्याद 5 ऑगस्ट 2023 रोजी शुभम नागेश कोमाकुल (रा. माळीवाडा) यांनी दिली होती. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज महाजन, अंमलदार नितीन गाडगे, वसंत सोनवणे, रवींद्र टकले, शाहीद शेख, प्रमोद लहारे, सुमीत गवळी, दीपक रोहकले तसेच सायबर सेल दक्षिण विभागाचे अंमलदार राहुल गुंडू यांनी ही कारवाई केली.

‘लाचलुचपत’च्या कायद्यात बदल करण्याची गरज – ना. विखेनगर आणि शिर्डी मतदारसंघासाठी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे निरीक्षक

- Advertisment -

ताज्या बातम्या