Wednesday, June 26, 2024
Homeनाशिककपडे खरेदीच्या बहाण्याने चोरी करणारे ताब्यात

कपडे खरेदीच्या बहाण्याने चोरी करणारे ताब्यात

युनिट एकची कारवाई

नाशिक। प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

कपडे खरेदीच्या बहाण्याने दुकानात जाऊन कपडे चोरून पळून जाणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. दोघांकडून चोरलेले कपडे हस्तगत करण्यात आले आहेत.

मोहमंद अन्वर सैयद (२९, रा. नानावली) व प्रविण उर्फ चापा लिंबाजी काळे (२४, रा. कॅनलरोड) असे पकडलेल्या संशयितांची नावे आहेत.कॉलेजरोडवरील कॅन्टाबिल शोरुममध्ये २५ मे रोजी दोन चोरटे कपडे खरेदीच्या बहाण्याने गेले. त्यांनी दुकानातील पॅंट, शर्ट, टीशर्ट, परफ्यूम, बरमुडा आदी सुमारे २८ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढला.

चोरट्यांनी बिल न देताच पळ काढल्याने सरकारवाडा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी वरिष्ठांसह सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने चोरट्यांचा शोध केला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक रवींद्र बागुल, हवालदार प्रदीप म्हसदे, प्रविण वाघमारे, नाइक विशाल देवरे, समाधान पवार आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या