Saturday, June 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPawanraje Nimbalkar Case : पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल खासदार ओमराजेंच्या विरोधात; फडणवीस...

Pawanraje Nimbalkar Case : पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल खासदार ओमराजेंच्या विरोधात; फडणवीस आणि शिंदेंची तातडीने अमित शाहांसोबत चर्चा, काय ठरलं?

मुंबई | Mumbai

गेल्या २० वर्षांपासून चाललेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिला. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील (Padmasinh Patil) यांच्यासह नऊ जणांची पुराव्या अभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. यामुळे ठाकरे गटातून शिंदे गटात जाण्यासाठी तयार असणारे बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

दुसरीकडे या प्रकरणी वरच्या न्यायालयात दाद मागणार असल्याचे ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी म्हटले आहे. आपल्या वडिलांच्या हत्येचा निकाल आपल्या बाजुने लागल्यानंतर ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत जाणार असल्याची चर्चा होती. मात्र आता मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच आपला पुढील राजकीय निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या प्रकरणी आज कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकाल येताच चर्चा केली. या निकालाची सर्व माहिती शाह यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ सीबीआयला या प्रकरणी वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिल्याचे समजते.तर या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या प्रकरणावर बोलताना म्हटले की, “पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात आज कोर्टाचा निकाल आला. सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. कारण पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्यासह दोन लोकांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. हे अतिशय गंभीर प्रकरण होते. या हत्याकांडातील आरोपींना शिक्षा मिळेल असा विश्वास कुटुंबिय आणि इतरांना होता, मात्र दुर्दैवाने विशेष न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली. याप्रकरणी मी स्वत: आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आम्ही दोघांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाविरोधात सीबीआय उच्च न्यायालयात जाऊन अपील करा आणि केस लढवा, असे निर्देश अमित शाह यांनी सीबीआयला दिले आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.

पुढील दोन दिवसांत निर्णय घेणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याच्या चर्चांवर बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की,”मी मतदारसंघात जाणार असून कार्यकर्त्यांची भावना समजून घेऊन पुढील दोन दिवसांनी पक्षांतराबाबत निर्णय घेईल”, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी ऑपरेशन टायगरमधून माघार घेतली तर पक्षांतर करण्यासाठी आवश्यक असलेला दोन तृतीयांशचा आकडा गाठणं शिंदेंसाठी अशक्य होणार आहे. परिणामी हे ऑपरेशन फेल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता ओमराजे निंबाळकर मतदारसंघात जाऊन काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना! हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला; सहा भाविकांचा मृत्यू, अनेकजण...

0
परभणी | Parbhani परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) मानवत तालुक्यातील (Manwat Taluka) यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिराचा (Hanuman Temple) सभामंडप अचानक कोसळल्याची दुर्दैवी घटना आज (शनिवार)...