Tuesday, April 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCM Devendra Fadnavis: "…त्यांनी महाराष्ट्राचा पप्पू आहे, असे प्रदर्शन करू नये"; मुख्यमंत्री...

CM Devendra Fadnavis: “…त्यांनी महाराष्ट्राचा पप्पू आहे, असे प्रदर्शन करू नये”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला

मुंबई | Mumbai
मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा आरोपाने राज्याचेही राजकारणही ढवळून निघाले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या मेळाव्यात वरळीतील मतदार यादीतील घोळाबाबत सादरीकरण केले. त्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. आदित्य ठाकरे यांना मी चांगले ओळखतो. त्यांनी महाराष्ट्राचा पप्पू आहे, असे प्रदर्शन करू नये, असे फडणवीस म्हणाले.

आज मंत्रीमंडळ बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निर्णयांची माहिती दिली. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांनी राज्याचे पप्पू बनू नये अशी अपेक्षा आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा राहुल गांधी बनू नये, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आदित्य ठाकरे यांना मी चांगले ओळखतो. त्यांनी महाराष्ट्राचा पप्पू आहे, असे प्रदर्शन करू नये, असे फडणवीस म्हणाले. राहुल गांधी यांनी मोठी स्क्रीन लावून इकडून तिकडून फिरू नये. खोदा पहाड निकला चुहा असे होते. सोमवारी आदित्य ठाकरे यांनीही तेच केले. त्यांनी राहुल गांधी बनू नये, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर केला.

मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णायाची माहिती दिली. किती शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत पोहचली, याची माहिती दिली. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ठाकरेंना पप्पू म्हणत विरोधकांवर टीकेचा बाण उडवलाय.

शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी मतचोरीवरून राज्य सरकार आणि आयोगावर हल्लाबोल केला होता. राहुल गांधी यांच्याप्रमाणेच त्यांनी प्रेझेंटेशन करत मतचोरी होत असल्याचा आरोप केला होता. आदित्य ठाकरेंच्या आरोपाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये, असा टोला लगावला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

IPL 2026 : राजस्थानसमोर पंजाबचे आव्हान; कोण मारणार बाजी?

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये यंदाच्या हंगामात अपराजित राहिलेल्या पंजाब किंग्ज समोर मंगळवारी (दि. २८) राजस्थान रॉयल्सचे आव्हान...