Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूज"…त्याला विरोध म्हणून हिंदू व भगवा दहशतवाद"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावरुन फडणवीसांचा काँग्रेसवर...

“…त्याला विरोध म्हणून हिंदू व भगवा दहशतवाद”; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावरुन फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल

मुंबई | Mumbai
मालेगाव बॉम्बब्लास्टप्रकरणी आज NIA च्या विशेष न्यायालयाने निकाल दिला. कुठलाही ठोस पुरावा मिळाला नाही यामुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेसने हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न केला, आता त्यांनी संपूर्ण समाजाची माफी मागावी असे फडणवीस म्हणाले आहेत.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
फडणवीस म्हणाले, कॉँग्रेसने हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न केला, आता त्यांनी संपूर्ण समाजाची माफी मागावी. कॉँग्रेसप्राणित यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा नेरेटीव सेट करण्याचा प्रयत्न केला होता. हिंदू व भगवा आतंकवाद आहे, हा प्रचार करण्याचा प्रयत्न केला. तो किती खोटा आहे हे आज सिद्ध झाले. कोर्टाने पुराव्यानिशी आज सांगितले आहे. ज्याच्यावर कारवाई केली त्यांची कॉँग्रेसने माफी मागावी. संपूर्ण हिंदू समाजाची कॉँग्रेसने माफी मगावी. असे फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘पोलिसांना दोष देणार नाही. युपीए सरकारने हे षडयंत्र तयार केले होते. पोलिसांवर त्यांचा दबाव होता. 9/11 हल्ल्यानंतर जगभरात हा दहशतवाद तयार झाला होता. इस्लामिक दहशतवाद तयार झाला होता. त्याला विरोध म्हणून हिंदू व भगवा दहशतवाद असा प्रकार यूपीए सरकारने निर्माण केला होता’ असे फडणवीस म्हणाले आहे.

YouTube video player

आतंकवादाचा आणि जिहादचा रंग हा हिरवाच आहे
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, ‘हिंदू समाजाची बदनामी जी या मालेगावच्या प्रकरणातून करण्याचा प्रयत्न होता, त्यांना तोंडावर चपराक मिळाली आहे. त्यामुळे यापुढे हिंदू समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. परत परत एकच विषय सिद्ध होतोय की, आतंकवादाचा रंग आणि जिहादचा रंग हा हिरवाच आहे. कॉंग्रेसच्या काळात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर खोट्या केस करण्यात आल्या, त्यांना अडकवण्यात आले.’

पुढे बोलताना राणे म्हणाले की, ‘हिंदुत्ववादी विचारसरणीचे राज्य आणि केंद्र सरकार असताना शक्य नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमचा हिंदू सुरक्षित आहे हे पुन्हा सिद्ध झालेय. खरेतर या लोकांनी हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे. यांनी मंदिरात जाऊन हिंदू समाजाची माफी मागावी. पुरावे यांच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले. ते कोर्टात कोणतेही पुरावे सिद्ध करू शकले नाहीत.’

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...