Thursday, May 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : "कोण गद्दार आणि कोण…"; मुख्यमंत्री फडणवीसांची कुणाल कामरा प्रकरणात पहिली...

Devendra Fadnavis : “कोण गद्दार आणि कोण…”; मुख्यमंत्री फडणवीसांची कुणाल कामरा प्रकरणात पहिली प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

- Advertisement -

स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने (Kunal Kamra) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून ते शोमध्ये सादर करत अप्रत्यक्ष टीका केली आहे. त्यामुळे याप्रकरणी कामरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कुणाल कामराच्या विरोधात शिवसेना (शिंदे) पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर आता कुणाल कामरावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यानंतर आता या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया देत मोठा इशारा दिला आहे.

यावेळी ते म्हणाले की, “कोण गद्दार आणि कोण खुद्दार आहे हे जनतेने दाखवले आहे. अश्याप्रकारे अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही. संविधानाने (Constitution) सांगितले आहे स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की त्यांनी माफी मागितली पाहिजे. माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान करण्याचे काम केले ते चुकीचे आहे. स्टॅण्डअप कॉमेडी अशी कॉमेडी करू शकत नाही. व्यंग करण्याचा अधिकार आहे. मात्र, जाणून अपमानित केले जात असेल, बदनामी करत असेल तर त्याला सहन केले जाणार, त्यावर कारवाई केली जाईल”, असे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी म्हटले.

कुणाल कामराच्या सेटची शिवसैनिकांकडून तोडफोड

कुणाल कामराने खार (Khar) येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये शो घेतला होता. या क्लबमध्ये जाऊन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालत या क्लबमधील खुर्च्यांची आणि संपूर्ण सेटची तोडफोड केली. तर शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातही शिवसेनेच्या समर्थकांनी जोरदार निर्देशने केली. वागळे इस्टेट पोलीस ठाण्याबाहेरही शिवसैनिकांनी कुणाल कामराचे फोटो जाळले.

कुणाल कामराचे नेमकं गाण काय?

स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने आपल्या कवितेत म्हटले की, शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली. राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून बाहेर आली. हा प्रकारात सर्वच कन्फूज झाले. हा प्रकार एकाने सुरु केला होता, असे सांगत गाण्याचे बोल सुरु होतात. ‘ठाणे की रिक्षा चेहरे पर दाढी, ऑख पर चष्मा… मेरी नजर से देखो तो गद्दार नजर आये… पारिवारिक कलह को खत्म करना चाहते थे। उन्होंने किसी के पिता को चुरा लिया। इसका क्या जवाब होगा? क्या मैं कल तेंडुलकर के बेटे से मिलूं, भाई, चलो डिनर करते हैं। मैं तेंदुलकर की प्रशंसा करता हूं और उनसे कहता हूं, भाई, आज से वे मेरे पिता हैं।

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...