Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे कधी मिळणार? फडणवीसांनी सभागृहातून...

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे कधी मिळणार? फडणवीसांनी सभागृहातून दिली महत्त्वाची माहिती

नागपूर | Nagpur

महायुती सरकारच्या (Mahayuti Government) मागील कार्यकाळात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) योजना आणण्यात आली आहे. या योजनेचा विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला फायदा देखील झाला. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळत आहेत. या योजनेचे लाभार्थी महिलांना जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे पाच हफ्ते देखील मिळाले आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने महिलांना दर महिन्याला १५०० ऐवजी २१०० रुपये देण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता पुढील हप्ता कधी जमा होणार? याकडे महिलांचे लक्ष लागून होते. त्यानंतर आता याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात बोलतांना माहिती दिली आहे.

- Advertisement -

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, “आम्ही जी आश्वासने दिली आहेत, ती आम्ही पूर्ण करणार आहोत. कुणीही मनात शंका ठेऊ नये. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे.विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील, राज्य सरकारने योजना सुरु करताना महिलांना दरमहा १५००रुपये दिले होते. त्याप्रमाणेच डिसेंबर महिन्याचे देखील १५०० रुपये महिलांच्या खात्यात पाठवले जातील”, असे त्यांनी म्हटले. तसेच या योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेले नसून आपण ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे देत आहोत, असेही फडणवीसांनी सांगितले.

YouTube video player

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये मिळणार की २१००?

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) प्रचारात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेद्वारे महिलांना त्यांची सत्ता आल्यास दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार महिलांना अर्थसंकल्पानंतर २१०० रुपयांप्रमाणे पैसे देण्यात येतील. मात्र,महिलांना डिसेंबरच्या हप्त्यामध्ये दरमहा १५०० रुपये मिळतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

लाडकी बहीण योजनेचे निकष नेमके काय आहेत?

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न कमी आहे, अशा महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. ज्या कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न हे वर्षाला अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही योजना २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. निकष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक अर्जदार महिलेला या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात आतापर्यंत दर महिन्याला १५०० याप्रमाणे पाच हफ्ते जमा झाले आहेत.

ताज्या बातम्या

Online Gaming : धक्कादायक! ऑनलाईन गेमचा नाद अन् तीन सख्या बहिणींची...

0
गाझियाबाद । Ghaziabad उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनातून तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींनी टोकाचे पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. साहिबाबाद परिसरातील भारत सिटी...