Thursday, May 29, 2025
HomeनाशिकCM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस रविवारी नाशकात; शाहीस्नानाच्या तारखांची घोषणा करणार

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस रविवारी नाशकात; शाहीस्नानाच्या तारखांची घोषणा करणार

नाशिक | Nashik 

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) रविवारी (दि.१) नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत सिंहस्थातील शाहीस्नानाच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. तसेच सिंहस्थ प्राधिकरणातील अधिकारी व सदस्यांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे पेशवेकाळापासून वेगवेगळ्या ठिकाणी स्नान करणारे वैष्णव व शैव आखाडे, कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने प्रथमच नाशिकमध्ये एकत्र येणार आहेत. रामकुंड व कुशावर्त येथे अनुक्रमे स्नान करणारे हे आखाडे बैठकीनिमित्त एकत्रित येणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस १३ प्रमुख आखाड्यांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी आणि स्थानिक साधू-महंत उपस्थित राहणार आहेत. मागील दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्येही (Nashik) कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप ते अस्तित्वात आले नाही. प्रवीण गेडाम हे या प्राधिकरणाचा अभ्यास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार प्राधिकरण कसे असावे याचा आराखडा तयार करण्यात आला असून अंतिम मंजुरीकरिता शासनाकडे पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे.

रविवार (दि.१) जून रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुंभमेळयाच्या (Kumbh Mela) तारखा जाहीर करण्यात येणार आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री प्राधिकरण अध्यादेश देखील प्रसिध्द करणार आहेत. प्राधिकरणामुळे सिंहस्थासाठी लागणाऱ्या कामांना वेग मिळेल अशी अपेक्षा आहे. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे होणाऱ्या शाही स्नानाच्या तारखा आधीच निश्चित झाल्या असल्या तरी, नाशिकमधील शाहीस्नानाच्या तारखांच्या अधिकृत घोषणांची उत्सुकता कायम होती. ही प्रतीक्षा आता संपणार आहे.

दरम्यान, नव्याने स्थापन झालेल्या सिंहस्थ प्राधिकरणाच्या माध्यमातून सिंहस्थाचे नियोजन, कामकाज व निधीच्या मंजुरीत सुसूत्रता येणार आहे. या प्राधिकरणात समाविष्ट करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांची व सदस्यांची नावेही यावेळी जाहीर होणार असल्याचे समजते. उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) सिंहस्थ प्राधिकरणाची निर्मिती केली असून, ही रचना सिंहस्थाच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

या आखाड्यांचा सहभाग

निर्वाणी आखाडा, निर्मोही आखाडा, दिगंबर आखाडा, जुना आखाडा, आवाहन आखाडा, अग्नी आखाडा, निरंजनी आखाडा, आनंद आखाडा, महानिर्वाणी आखाडा, अटल आखाडा, बडा उदासिन आखाडा, नया उदासिन आखाडा, निर्मल आखाडा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शरद

Devendra Fadnavis: “जय-पराजयाचा विचार न करता सातत्याने…”, CM फडणवीसांकडून शरद पवारांचे...

0
मुंबई | Mumbai राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असे म्हटले जाते. याचा प्रत्यय महाराष्ट्रातील जनतेला गेल्या ६ वर्षांपासून सातत्याने येत आहे. एकेकाळी एकमेकांचे...