Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : "पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही"; फडणवीसांचा इशारा, विधानसभेत सांगितला...

Devendra Fadnavis : “पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही”; फडणवीसांचा इशारा, विधानसभेत सांगितला संपूर्ण घटनाक्रम

मुंबई | Mumbai

नागपूरातील महाल भागात सोमवारी (दि.१७) रोजी रात्री दोन गटांमध्ये तुफान दगडफेक आणि जाळपोळ होऊन मोठा हिंसाचार झाला. संतप्त जमावाने परिसरातील दुचाकी व चारचाकी वाहनांना आगाी लावल्या.हा कट पूर्वनियोजित असल्याचा दावा केला जात असून या प्रकरणावरुन राजकारण सुरू झाले आहे. या हिंसाचारावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. त्यानंतर आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी निवेदन करत घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली.

- Advertisement -

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “काल नागपूर शहरातील (Nagpur City) महाल परिसरात साडे अकरा वाजता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव अशा घोषणा देत आंदोलन केले. आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंढ्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली. यानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला. यानंतर सायंकाळी अफवा पसरली गेली. यानंतर दोनशे ते अडीचशे लोकांचा जमाव जमला. घोषणा देऊ लागला. यानंतर या लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे सुरू केल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला”,असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की,”याआधी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची तक्रार द्यायची असे सांगितले होते. त्यांना गणेशपेठ पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. तक्रार ऐकून घेण्यात आली. एकीकडे पोलिसांची कार्यवाही सुरू असताना दुसरीकडे हंसापूरी भागात काही लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले. त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते. या घटनेत बारा दुचाकींचे नुकसान झाले. तसेच काही लोकांवर घातक शस्त्राने हल्ला करण्यात आला. याशिवाय काही लोकांनी घरांवर जमा करून ठेवलेले दगड पाहायला मिळाले. शस्त्रंही मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली आहे. वाहनांची जाळपोळ झाली आहे. ठरवून काही ठराविक घरांना, आस्थापनांना लक्ष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे यात काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसत आहे”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

डीसीपींवर कुऱ्हाडीने वार

नागपूर (Nagpur) दंगलीमध्ये तीन डीसीपी जखमी झाले असून त्यातील एकावर चक्क कुऱ्हाडीने वार करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांवर हल्ला करणारे जे कुणी असतील, त्यांना सोडणार नाही,असेही देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले. तसेच या घटनेत एक क्रेन, दोन जेसीबी व काही चारचाकी वाहने जाळण्यात आली. या संपूर्ण घटनेत ३३ पोलीस जखमी झाले आहेत. त्यात तीन उपायुक्त दर्जाचे पोलीस आहेत. तर एकूण ५ नागरिक जखमी झाले असून तिघांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.तसेच दोन रुग्णालयात आहेत. त्यापैकी एक आयसीयूत आहे”, अशी माहितीही फडणवीसांनी दिली.

एकूण पाच गुन्हे दाखल

फडणवीस म्हणाले की,”एकूण तीन गुन्हे गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. तहसील पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. असे एकूण पाच गुन्हे आहेत. तर ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच एंट्री पॉइंटवर नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यात तहसील, कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली, लकडगंज, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोदरानगर, कपिलनगर या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.याशिवाय एसआरपीएफच्या पाच तुकड्या इथे तैनात करण्यात आल्या आहेत”, असेही त्यांनी म्हटले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...