Tuesday, May 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis: खराडी रेव्ह पार्टी घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,...

Devendra Fadnavis: खराडी रेव्ह पार्टी घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अशा प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी घडला आहे…

मुंबई | Mumbai
पुण्यातील खराडीमधील एका सोसायटीत सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर आज पुणे पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. या कथित रेव्ह पार्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्यातील रेव्ह पार्टीच्या घटनेबाबत मी माध्यमांत बातम्या पाहिल्या आहेत. मी सकाळपासून कार्यक्रमात होतो, त्यामुळे मला त्या घटनेसंदर्भात अद्याप अधिकृत माहिती घेता आलेली नाही. मात्र, माध्यमांमधून जी काही माहिती समोर आली आहे, त्यानुसार पोलिसांनी रेव्ह पार्टीवर छापा टाकत कारवाई केली आहे. त्या कारवाईत काही ड्रग्स वगैरे आढळून आलेले आहेत. या घटनेची मी जेव्हा अधिकृत माहिती घेईल, तेव्हा सविस्तर बोलू शकेन. पण प्राथमिक माहितीनुसार अशा प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी घडला आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

- Advertisement -

रविवारी पहाटे ३.२० वाजण्याच्या सुमारास सुमारास स्टेबर्ड अझुर सुट याठिकाणी गुन्हे शाखेने कारवाई केली. ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल मनिष खेवलकर (वय ४१), निखिल जेठानंद पोपटाणी (वय ३५), समीर फकीर महमंद सय्यद (वय ४१) सचिन सोनाजी भोंबे (वय ४२), श्रीपाद मोहन यादव (२७) ईशा देवज्योत सिंग (२२), प्राची गोपाल शर्मा (२५) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींकडून ४१ लाख रुपये ज्यामध्ये २.७० ग्रॉम कोकेन सदृश पदार्थ, ७० ग्रॉम गांजा सदृश पदार्थ जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींकडून १० मोबाईल, दोन चारचाकी वाहने, हुक्कापॉट सेट आणि दारू व वियरच्या बॉटल, हुक्का फ्लेवर जप्त करण्यात आले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik News : पंचवटीतील श्री काळाराम मंदिरावर उद्या धर्मध्वजारोहण

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिकचे श्रद्धास्थान असलेल्या काळाराम मंदिरात अयोध्येच्या धर्तीवर २१ फूट उंच भव्य पितळी ध्वजदंड उभारण्यात आला आहे. या ध्वजदंडावर...