Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : जयकुमार गोरे प्रकरणावरून सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांबाबत...

Devendra Fadnavis : जयकुमार गोरे प्रकरणावरून सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा विधानसभेत मोठा दावा

मुंबई | Mumbai

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर एका महिलेने (Woman) आरोप करत त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी सदर महिलेला सापळा रचून अटक (Arrested) करण्यात आली. या प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास चालू असतानाच यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठी धक्कादायक माहिती सभागृहात उघड केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरोपी महिला व तिच्यासोबतचे सहकारी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि आमदार रोहित पवार यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

त्याचबरोबर विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी आम्ही तिघे एकमेकांच्या पायात पाय घालणार नाही. तर एकमेकांच्या हातात हात घेऊन काम करणारे असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की,”जयकुमार गोरेंबाबत घडलेली घटना महत्त्वाची आहे. एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचे राजकारण योग्य नाही. २०१७ साली ही घटना घडली, त्यावेळी ते आमच्यासोबत नव्हते. दोषी आहेत की नाही, यापेक्षा समाजात अपमान नको म्हणून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न असतो. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. अनेक संवाद टेप केलेले आहेत. हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार होता. त्याला हवा देऊ नका”, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच “जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात (Case) तीन तक्रारी झाल्या. हे सगळं नेक्सस होते. तुषार खरात नावाचा एक तथाकथित युट्युबर आहे. जयकुमार गोरेंनी पहिली तक्रार केली. विराज रतनसिंह शिंदे यांनी दुसरी तक्रार केली आणि त्यानंतर तिसरी उमेश मोहिते यांनी तक्रार केली. हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील ही महिला असल्याचा बनाव करण्यात आला. या प्रकरणी एक चौथी एक तक्रार झाली. त्यातील तीन लोकांना अटक झाली. पहिली महिला, दुसरा रिपोर्टर आणि तिसरा अनिल सुभेदार आहे. या सगळ्यांनी रचलेला कट उघड झाला आहे. व्हॉट्स अॅप मेसेज समोर आले आहेत. शेकडो फोन सापडले आहेत. या सर्वांसोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) लोक सापडले आहेत”, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “मी हे पुराव्यानिशी सांगत असून प्रभाकरराव देशमुख (Prabhakarrao Deshmukh) हे थेट तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत. मला वाईट वाटतं ते म्हणजे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांचे कॉल्स तुषार खरात (Tushar Kharat) यांच्यासोबत आहेत. गोरे यांच्याविरुद्ध जे व्हिडिओ केले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी सुळे आणि पवार यांना पाठवले आहेत. आता याची चौकशी होणार आहे. हे काय चाललं आहे. आपण राजकीय शत्रू नाही, राजकीय विरोधक आहोत, अशाप्रकारे कोणाला जीवनातून उठवणे चुकीचे आहे”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...