कोल्हापूर | Kolhapur
‘ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान पुरस्कृत १०० दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने कंठस्नान घातले. आम्ही पाकिस्तानी नागरिकांवर कोणताही हल्ला केला नाही. पाकिस्तानने भारतासमोर गुडघे टेकल्यानंतरच आपण युद्धविराम केला. एकीकडे इचलकरंजीत आमचा राहुल भारतीय जवानांच्या शौर्याबद्दल अडीच किलोमीटरची तिरंगा यात्रा काढतोय तर दुसरा राहुल (राहुल गांधी) विमान कशी पडली हल्ले कसे झाले असे विचारता. काँग्रेसच्या डोक्यात पाकिस्तानी व्हायरस घुसला आहे. ज्यांच्या डोक्यात पाकिस्तानी व्हायरस घुसला आहे त्यांना समजावणार कोण?’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील ७१३ कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचे उद्घाटन, शुभारंभ व लोकार्पण पार पडले. यावेळी बोलताना फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
फडणवीस म्हणाले की, पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात ड्रोन पाठवले. मात्र, त्यांचा एकही ड्रोन हल्ला करू शकला नाही. आपल्या सैन्यांनी ते नेस्तनाबूत करून टाकले. पाकिस्तानकडे अशा प्रकारचे शस्त्रचं नाही जे भारताच्या भूमीला टच करू शकेल. पाकिस्तानने गुडघे टेकल्यानंतर आपण युद्धविराम केला, आम्ही पाकिस्तानी नागरिकांवर कोणताही हल्ला केला नाही. त्यांनी सांगितले की, या युद्धातील सर्वात मोठी उपलब्धी सर्व युद्ध साहित्य मेड इन इंडिया आहे. एक राहुल ( आमदार राहुल आवाडे) अडीच किलोमीटर तिरंगा यात्रा काढतो तर दुसरा राहुल (राहुल गांधी) विमान कशी पडली, हल्ले कसे झाले असे विचारतो. पाकव्याप्त काश्मीर आपल्याला धोका नाही तर पाक काबुत काँग्रेस देशाला धोका असल्याची टीका त्यांनी केली. ज्यांच्या डोक्यात पाकिस्तानी व्हायरस घुसला आहे त्यांना समजावेल कोण? ऑपरेशन तिरंगाच्या माध्यमातून नवीन भारत जगाने पाहिल्याचे ते म्हणाले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शहापूर येथील नवीन पोलीस स्टेशनच्या इमारतीचे उद्घाटन देखील केले. यावेळी त्यांनी संपूर्ण पोलीस स्टेशन पाहत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना शुभेच्छा देखील दिल्या. यानंतर ७१३ कोटींहून अधिकच्या विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते पार पडला. यानंतर त्यांनी जाहीर सभेला देखील संबोधित केले. ऑपरेशन तिरंगाच्या माध्यमातून नवीन भारत जगाने पाहिला असून पाकव्याप्त काश्मीरपेक्षा पाकव्याप्त काँग्रेस देशाला धोका असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगिनींच्या सिंदूरचा बदला घेतला. मसूद अहमद, सईद यांच्या परिवारासोबत १०० आतंकवाद्यांना पंतप्रधान मोदींमुळे कंठस्थान घालण्यात यश आले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीमध्ये केले. काँग्रेसचे विचार हे पाकिस्तानने हायजॅक केलेत. या मूर्खांना माहीत नाही शेतीचे ड्रोन आणि युद्धाचे ड्रोन वेगळ्या असतात, या मूर्खांना आता कोण समजावेल. काँग्रेसच्या डोक्यात पाकिस्तानचा व्हायरस आहे. त्यांचा हार्ड डिस्क करप्ट केलाय. हा नवा भारत आहे भगिनींचे सिंदूर पुसले तर आम्ही घरात घुसून मारू असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, इचलकरंजी व परिसराच्या विकासाबद्दल जे काही प्रस्ताव येतील त्याला तातडीने मान्यता देण्यात येईल. यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुकही त्यांनी केले. ‘सहा महिन्यांनी इचलकरंजी आलो, मागच्या वेळी आलो तेंव्हा संघर्ष पर्व होत आता विकास पर्व आहे. आपल्या सरकारला 6 महिने झाले, कार्यालयामध्ये स्पर्धा लावली, १०० दिवसांचा यशस्वी कार्यक्रम केला. मागच्या वेळी सरकार असताना आम्ही महापुराचं विश्लेषण केलं होतं. २०१९ ला आम्ही जागतिक बँकेला प्रस्ताव दिला आहे. पुढच्या काही दिवसांत याच टेंडर काढत आहोत. अलमट्टीबाबत सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ, कोल्हापूर सांगली भागात कमी कालावधीत जास्त पर्जन्य होत असल्याने येथील कायम निर्माण होणारी महापुराची परिस्थिती कायमची संपवण्यासाठी अतिरिक्त पाणी वळवल्यामुळे निम्म्या महाराष्ट्रातील दुष्काळ कमी होईल. यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,’ असेही फडणवीसांनी कोल्हापुरकरांना आश्वस्त केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा