Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजCM Devendra Fadnavis: ‘मी पुन्हा येईन’ माझा पिच्छा सोडत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र...

CM Devendra Fadnavis: ‘मी पुन्हा येईन’ माझा पिच्छा सोडत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तुफान फटकेबाजी

पुणे | Pune
राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे पुण्यात ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत तिसरे विश्व मराठी संमेलन होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करत असताना त्यांनी खुमासदार भाषण करत चौफेर फटकेबाजी केली. मी पुन्हा येईन, हे वाक्य माझा पिच्छाच सोडत नाही. अलीकडच्या काळात चांगले म्हणतात, मागच्या काळात उपहासाने म्हणत होते. शेवटी एखादा शब्द आपल्याला चिटकतो, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुफान फटकेबाजी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उदय जी मी तुमचे आभार मानतो की, तुम्ही संमेलनाला मुंबईतून पुण्यात आणले. माझ्यासारख्या नागपुरी माणसाला पुण्याची मराठी प्रमाण आहे. अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिले संमेलन असल्यामुळे पंतप्रधान नरेंद मोदी जी यांचे आभार मानतो. मधू मंगेश कर्णिक यांचा सत्कार आपण करतो आहोत, सृजनशील व्यक्तिमत्व आज नाबाद 93 आहेत ते मराठीला समृद्ध करणारे आहेत. त्यांचा सत्कार करताना आपल्या सर्वांना अतिशय आनंद होतोय, असे देवेंद्र फडणवीस या प्रसंगी म्हणाले.

- Advertisement -

सावरकरांशिवाय मराठीच विचार करु शकत नाही
इथे जे कवि संमेलन होणार आहे, त्यासाठी काव्यपाठ करण्यासाठी बेळगाव-निपाणीहून मराठी कवी येणार आहेत. मराठी माणसाच्या पाठिशी भक्कमपणे उभी राहण्याची जी भावना असते, ती यात आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. “आपल्या बालगंर्धवला सागरा प्राण तळमळला हा कार्यक्रम होणार आहे. जेव्हा आपण मराठीचा विचार करतो, तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांशिवाय आपण मराठीचा विचार करु शकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीला जी शब्दांची माय दिली, जो शब्दकोष त्यांनी दिला, शब्दांचा खजिना दिला. त्यामुळे निश्चितपणे हा एक चांगला महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठव्या शतकातील एका पुस्तकाचा दाखला दिला. ज्यात मराठी माणसाचे गुण आणि अवगुण याबाबत माहिती दिलेली आहे. मराठी माणूस हा कलहशील असल्याचे आठव्या शतकात लिहून ठेवलेले आहे. मराठी माणसाला कलह करायला आवडतो, म्हणून आपण संमेलन आयोजित करण्याचे थांबणार नाही. अशा संमेलनातूनच चांगले काम करण्याची शक्ती आणि बुद्धी आपल्याला मिळत असते.

“वादाच्या पुढे जाऊन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विश्व मराठी संमेलन आयोजित करून दाखविले त्याबद्दल उदय सामंत यांचे फडणवीसांनी आभार व्यक्त केले. जगभरात असा एकही देश नाही, जिथे मराठी माणूस पोहोचलेला नाही. कोणत्याही देशात आम्ही दौऱ्यासाठी गेलो तरी तिथे स्वागतासाठी मराठी माणसे लांबून लांबून येतात. हे बघून अतिशय आनंद वाटतो.

मी पुन्हा येईन पिच्छाच सोडत नाही
जपान, अमेरिका गेलो, तिथे मराठी माणूस स्वागताला होता. दावोसला गेल्यावरही मराठी माणसे आली होती. एका चिमुरड्याने, ‘लाभले आम्हाला भाग्य बोलतो मराठी,’ हे इतक्या सुंदरपणे म्हणून दाखवले. मला एवढा अभिमान वाटला की, आपला मराठी माणूस इतके वर्षे तिकडे गेला, तरी त्याच्यापासून माय मराठी दुरावली नाही. माय मराठी त्याच्या मनात आहे. ती माय मराठी पुढील पिढीला पोहोचवण्याचे काम तो करत आहे. त्यावेळी त्या चिमुरड्याने, ‘मी पुन्हा येईन सुद्धा’ म्हटले. हे ‘मी पुन्हा येईन’ माझा पिच्छा सोडत नाही, अजितदादा… कुठेही गेले की, ‘मी पुन्हा येईन..’ परंतु, अलीकडील काळात चांगले बोलतात. मागील काळात उपहासाने म्हणायचे. शेवटी एखादा शब्द आपल्याला चिकटतो. काळ आणि वेळानुसार त्याचे अर्थ बदलतात. जेव्हा, जेव्हा विश्व मराठी संमेलन होणार, तेव्हा, ‘मी पुन्हा येईन,’ ‘मी पुन्हा येईन,’” असे फडणवीस यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...