Tuesday, April 7, 2026
HomeनाशिकNashik News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशिक जिल्हा दौऱ्यावर

Nashik News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशिक जिल्हा दौऱ्यावर

ओझर विमानतळाच्या एकात्मिक टर्मिनल इमारतीच्या बांधकाम विस्तारीकरणाचे करणार भूमिपूजन, णमोकार जन्मकल्णाक सोहळ्याला राहणार उपस्थित

नाशिक | प्रतिनिधी
चांदवड येथील नवनिर्मित श्री णमोकार तीर्थाच्या पावन प्रांगणात सुरू असलेल्या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाचा ‘जन्मकल्याणक (पूर्वार्ध)’ म्हणून साजरा होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहे. तसेच ओझर विमानतळावर नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीच्या बांधकाम व विस्तारीकरणाचा भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार आहे.

रविवार, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता हा सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित (एमएसआयडीसी) यांच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

- Advertisement -

Piyush Goyal: भारतीय शेतकऱ्यांना कराराचा फटका बसणार? मंत्री पियुष गोयल यांनी विरोधकांचा दावा खोडला, म्हणाले, काही लोक…

यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अभयसिंहराजे भोसले, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख पाहुणे म्हणून अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव एकनाथ दवले, विभागीय आयुक्त प्रविण गेडाम, आयुक्त गोवर्धन सिंग, तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

ओझर विमानतळावरील नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीमुळे नाशिक जिल्ह्यातील हवाई वाहतूक सुविधा अधिक सक्षम होणार असून प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. आगामी काळात औद्योगिक, पर्यटन व व्यापारी क्षेत्राला या प्रकल्पामुळे मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या पायाभूत विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार असल्याचे मानले जात आहे.

ताज्या बातम्या

Crime News : क्रिकेटच्या वादातून युवकाला मारहाण

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील पिंजार गल्ली, पीरशहा खुंट परिसरात क्रिकेट खेळताना झालेल्या किरकोळ वादातून एका युवकाला मारहाण करून जखमी केल्याची घटना रविवारी (5 एप्रिल) रात्री...