Thursday, May 15, 2025
HomeUncategorizedAhilyanagar : जगताप कुटुंबाच्या पाठीशी कायम उभा राहील - मुख्यमंत्री फडणवीस

Ahilyanagar : जगताप कुटुंबाच्या पाठीशी कायम उभा राहील – मुख्यमंत्री फडणवीस

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

दिवंगत माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्व. अरुणकाका जगताप यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना श्रध्दांजली वाहिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जगताप कुटुंबाच्या पाठीशी मी नेहमी उभा राहील. काळजी करू नका. त्यांनी स्व.जगताप यांच्या पत्नी श्रीमती पार्वतीबाई जगताप यांच्याशी संवाद साधत त्यांना धीर दिला. तसेच आमदार संग्राम जगताप व सचिन जगताप यांच्याशीही चर्चा करत सहवेदना व्यक्त केल्या. यावेळी स्व.जगताप यांची कन्या डॉ.वदना फाटके, जावई डॉ.शशिकांत फाटके व इतर आप्तेष्टही उपस्थित होते. या भेटीप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार विक्रम पाचपुते, आमदार राहुल कुल, पद्मश्री पोपटराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अरूणकाका जगताप हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक सुसंस्कृत व कार्यक्षम व्यक्तिमत्त्व होते. ते दोन वेळा विधानपरिषदेवर निवडून गेले होते. जिल्ह्यातील नेतृत्व घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या अकाली निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्य संग्राम जगताप समर्थपणे पुढे नेतील, याबाबत मला पूर्ण विश्वास आहे.

मंत्र्यांकडून सहवेदना व्यक्त
दरम्यान मंगळवारी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, दुग्धविकास मंत्री अतुल सावे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आ. विक्रमसिंह पाचपुते, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, कायनेटिक कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अजिंक्य फिरोदिया, पुण्यातील उद्योगपती रणजीत खेर, लोहित पवार व शाबाज तांबोळी आदींनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप व आ. संग्राम जगताप यांची निवासस्थानी भेट घेऊन सहवेदना व्यक्त करत सांत्वन केले. यावेळी आ.शिवाजीराव कर्डिले, डॉ.विजय भंडारी, अनिल मुरकुटे, प्रकाश भागानगरे, प्रा.माणिक विधाते, संजय चोपडा, सुभाष पोखरणा, शिवसेनेचे सचिन जाधव, भाजपचे भरत ठुबे, गणेश गोंडाळ आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...